पुणे विभागातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची मांडलेली शिक्षक मतदार संघाची निवडणूक चंद्रकांतदादा पाटील यांच्या ‘चाणाक्ष’नीतीमुळे विचारसरणीच्या तिहेरी मत विभागणीचेही सुयोग्य नियोजन करण्यात आल्याने एकतर्फी वाटणाऱ्या काँग्रेसला धोबीपछाड देण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. पुणे पदवीधर मध्ये दोन्ही महायुतीतील इच्छुकांचे बंड शमवण्यात यश आले तरीही विजय मात्र खेचण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला अपयश आल्याने पुणे विभागातील दोन्ही धक्कादायक निकालांमुळे राज्याचे लक्ष विचलित झाले आहे. विरोधकांची मत विभागणी लक्षात घेऊन निष्क्रिय राहिलेल्या काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे यश मिळवणे अवघड झाले तर सलग दुसऱ्यांदा विजयश्री खेचणारे ‘पदवीधर’उमेदवार आपल्या पक्षांमध्ये सामील करण्याची शरद पवार यांची रणनीती या निकालामुळे यशस्वी झाल्याची चर्चा पुणे पदवीधर मतदारसंघांमध्ये रंगत आहे.
महाराष्ट्रात विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. यात शिक्षक मतदारसंघाच्या दोन आणि पदवीधर मतदारसंघाच्या तीन जागा आहेत. काल सकाळी आठ वाजल्यापासून ही मतमोजणीची प्रक्रिया सुरु झाली आहे. आता 24 तास होत आले, तरी अजून निकाल आलेले नाहीत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सामना आहे. महायुती निर्विवाद वर्चस्व गाजवेल असं वाटलेलं. पण महाविकास आघाडीने चांगली टक्कर दिली आहे. पुणे पदवीधरमध्ये चुरशीची लढाई सुरु आहे.
आतापर्यंतच्या मतमोजमीच्या सर्व अपडेट्स जाणून घ्या.
पुणे पदवीधर निकाल अपडेट
पुणे विभाग पदवीधर निवडणूक निकालात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख विजयाच्या उंबरठ्यावर तर भारतीय जनता पार्टीचे कौस्तुभ गावडे विजयाच्या उंबरठ्यावर.
पुणे विभाग मतदारसंघात महायुती 1 तर महविकास आघाडी 1 असा बरोबरीत मुकाबला.
पुणे पदवीधर मध्ये पहिल्या फेरी मध्ये हर्षदा जाधव यांना 1,12,400 मत
स्मित जाधव यांना 10,2000 हजार मतं मिळाली आहेत
हर्षदा जाधव यांना 716 मतांची आवश्यकता आहे कोटा पूर्ण करण्यासाठी1,13,113 कोटा पदवीधरसाठी ठरला आहे.
पुणे शिक्षक अपडेट
शिक्षक मतदारसंघात सचिन सानप दुसऱ्या स्थानी मात्र कौस्तुभ गावडे आणि सचिन सानप यांच्या मतांमध्ये मोठा फरक.
शिक्षक मतदारसंघात 19 व्या बाद फेरी अखेर
- कौस्तुभ गावडे यांना 17,600
- सचिन सानप यांना 11,328
- दत्तात्रय सावंत यांना 10,377
- जयंत आसगावकर यांना 8,350
नागपूर पदवीधर निकाल अपडेट
- नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक
- दुसऱ्या फेरी अंती मिळालेले मत
- अभिजीत वंजारी – 56630
- सुधाकर कोहळे -60924
- नितेश कराडे -24249
दुसऱ्या फेरी अखेरीस 4294 मतांनी भाजप चे सुधाकर कोहळे आघाडीवर…
- अवैध मत – 15106
मतमोजणी नंतर 1 लाख 50 हजार 874 मत हे वैध ठरली आहे. त्यानुसार कोटा 75 हजार 438 मताचा कोटा ठरला असतांना दोन्ही उमेदवार हे मत घेऊ शकले नाहीत, त्यामुळे दुसऱ्या पसंती क्रमांची मतं मोजली जातील.दुसऱ्या पसंतीची मत कोणाला ठरलेल्या कोट्या पर्यंत नेतील याकडे लक्ष लागलं आहे.
अमरावती शिक्षक निकाल अपडेट
- मागील 23 तासांपासून मतमोजणी सुरू
- 19 व्या बाद फेरी अंती शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार किरण सरनाईक हे 3535 हजार मतांनी आघाडीवर.
- शिंदेंच्या शिवसेनेचे बंडखर उमेदवार श्रीकांत देशपांडे दुसऱ्या क्रमांकावर.
- तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे तिसऱ्या क्रमांकावर.
- 19 व्या बाद फेरीअंती शिवसेनेचे उमेदवार किरण सरनाईक यांना 8348 मते.
- शिवसेनेचे बंडखोर श्रीकांत देशपांडे यांना 4813 मते.
- तर काँग्रेसच्या उमेदवार आदिती पोहरे यांना 4786 मते.
विजयासाठी 16 हजार 134 मतांचा कोटा.
किरण सरनाईक यांना 7796 मतांचा कोटा गाठणे आवश्यक.
मराठवाडा पदवीधर निवडणूक- मतमोजणी पूर्ण
(पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कोणत्याच उमेदवाराला कोटा पूर्ण करता न आल्याने दुसाऱ्या पसंतीची मतं मोजली जाणार)
- डॉ. प्रतापसिंह पाटील – 78,540
- सतीश चव्हाण – 55,180
- रविराज साबळे – 20, 470
- दिलीप घुगे – 8, 366
23 हजार 360 मतांनी डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर



