राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या

0

महाराष्ट्रातील हवामानात ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील बहुतांश भागांत सध्या उष्ण आणि कोरडे हवामान कायम असले, तरी आगामी दोन ते तीन दिवसांत काही जिल्ह्यांत अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे.विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

२६ ऑक्टोबर रोजी राज्यातील हवामान कसे राहणार आणि आगामी दिवसांत कोणत्या भागांत पावसाची शक्यता आहे, हे जाणून घेऊयात…..

मुंबईसह कोकणात हवामान कोरडे

मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत २६ ऑक्टोबर रोजी हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांत या भागांत उष्ण आणि दमट हवामानामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. मात्र, आता हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत दक्षिण कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत हलक्या पावसाच्या सरी कोसळू शकतात.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

उत्तर महाराष्ट्रात कोरडे हवामान; रात्री गारवा

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत २६ ऑक्टोबर रोजी पावसाची शक्यता नाही. नाशिकच्या घाटमाथा परिसरातही हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. रात्री आणि पहाटेच्या वेळी काही भागांत हलका गारवा जाणवू शकतो. दरम्यान, २८ ऑक्टोबरपासून या भागांत हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता कधी?

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांत आज हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावरही पावसाची शक्यता नाही. मात्र, आगामी दोन दिवसांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे हवामानातील बदलांकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

मराठवाड्यातील जिल्ह्यांत काय स्थिती?

छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत २६ ऑक्टोबर रोजी हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मात्र, पुढील काही दिवसांत मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत वादळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.

विदर्भात वादळी पावसाचा अंदाज

अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत आज कोणताही विशेष इशारा देण्यात आलेला नाही. मात्र, पुढील दोन दिवसांत विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार