बारामतीत मित्रपक्षाचा ‘संग्राम’ सुनेत्रा वहिनींकडून ठेचून निष्प्रभ; ‘सोमेश्वर’ला 21-0 ने बंडखोरी गारद; मायलेकांची स्तुत्य कामगिरी

0

संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागलेल्या बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील पॅनेलने दणदणीत विजय मिळविला. बारामतीत मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने बंडखोरी केलेल्या लोकांना सोबत घेऊन’संग्राम’असल्याचे चित्र निर्माण केले होते परंतु उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींकडून याला वेळीच ठेचून निष्प्रभ करण्याचे काम केले.’सोमेश्वर’ला 21-0 ने बंडखोरी गारद उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार व पार्थ आणि जय या दोन्ही मायलेकांची स्तुत्य कामगिरी झाल्याची चर्चा परिसरामध्ये सुरू आहे. सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेलने एकवीसपैकी अठरा जागा जिंकत एकहाती वर्चस्व मिळविले. भाजपच्या मदतीने बंडखोरी करणारे विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप, माजी आमदार संजय जगताप यांच्या नेतृत्वातील लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल व युवा नेते युगेंद्र पवार यांच्या सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेलला पराभवाला सामोरे जावे लागले.

अधिक वाचा  केंद्र सरकारने 15 ते 20 वर्षांचे यंदा धोरण बदलले; शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पाने? देशातील साखर उद्योगाच गणित कोलमडणार

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत अखेरच्या क्षणी नाटय़मय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पॅनेलमधील काही उमेदवारांच्या नावावर आक्षेप घेत पुरुषोत्तम जगताप यांनी बंडाचा झेंडा फडकवला. अवघ्या एका दिवसात त्यांनी पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप, राष्ट्रवादीचे सुदाम इंगळे, माणिक झेंडे यांना सोबत घेत वेगळी चूल मांडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर तालुक्यातील मोठय़ा संस्थेची ही पहिलीच निवडणूक होती. त्यात अजित पवार गट सुरुवातीला काहीसा गाफील राहिला. परंतु जगताप यांच्या बंडानंतर त्यांनी जोरदार ताकद पणाला लावली. कारखान्याच्या प्रगतीत 1992 पासून अजितदादांनी दिलेले योगदान, त्यांच्या निधनानंतरही भावनिक साद, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अखेरच्या टप्प्यात घेतलेली आक्रमक भूमिका, खा. पार्थ पवार यांनी केलेले प्रचाराचे नियोजन, युवा नेते जय पवार यांनी गावोगावी-वाडय़ावस्त्यांवर जात केलेला प्रचार, पुरंदरमधून आमदार विजय शिवतारे यांची मिळालेली खमकी साथ या पॅनेलला विजयापर्यंत घेऊन गेली.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?