महाराष्ट्रात महायुती की मविआची सत्ता येणार? एक्झिट पोल्सचे अंदाज काय? वाचा!

0

महाराष्ट्र विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे. महाराष्ट्रात आज २८८ विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडलं आहे. आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवारांचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे.

 

दरम्यान, आता महाराष्ट्राच्या जनतेचा कौल नेमकी कुणाला? महाविकास आघाडीला की महायुतीला? तसेच कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात? किती अपक्ष उमेदवार निवडून येतात? या यासंदर्भातील एक्झिट पोल आता समोर आले आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकी काय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे? जाणून घेऊयात…..

 

सत्ताधारी भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुती विजय मिळवून महाराष्ट्रात सत्ता कायम ठेवेल असा अंदाज काही एक्झिट पोल्सनुसार वर्तवण्यात येत आहे. यामध्ये मॅट्रीक्स, पोल डायरी, चाणक्य, पी-एमएआरक्यू या एक्झिट पोल्सने महायुतीला जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

 

कोणत्या एक्झिट पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यू पोल्सचा अंदाज काय?

पी-एमएआरक्यूने महायुती १३७ ते १५७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. तर महाविकास आघाडीला १२६ ते १४६ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे, तसेच इतर २ ते ८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

 

चाणक्यचा एक्झिट पोल काय?

 

महायुती १५२ ते १६० :

(भाजप-९०, शिवसेना शिंदे-४८, राष्ट्रवादी (अजित पवार) २२)

महाविकास आघाडी १३० ते १३८ :

(काँग्रेस-६३, शिवसेना (ठाकरे) ३५, राष्ट्रवादी (शरद पवार) ४० आणि इतर ६ ते ८)

 

 

मॅट्रीक्सचा एक्झिट पोल काय?

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

 

महायुती १५० ते १७० :

(भाजप-८९ ते१०१, शिवसेना शिंदे-३७ ते ४५, राष्ट्रवादी (अजित पवार) १७ ते २६)

 

महाविकास आघाडी ११० ते १३० :

(काँग्रेस-३९ ते ४७, शिवसेना (ठाकरे) २१ ते ३९, राष्ट्रवादी (शरद पवार) ३५ ते ४३)

 

पोल डायरीचा अंदाज काय?

महायुतीच्या पोल्सनुसार

महायुतीला १२२ ते १८६ जागा

भाजपाला ७७ ते १०८,

शिवसेना (शिंदे) २७ -५०,

राष्ट्रवादी (अजित पवार) १८ ते २८

महाविकास आघाडीला ६९ ते १२१ जागा

काँग्रेस २८-४७,

शिवसेना (ठाकरे) १६ ते ३५,

राष्ट्रवादी (शरद पवार) २५ ते ३९ जागा

मिळतील असा अंदाज आहे.

 

पीपल्स पल्स एक्झिट पोलचा अंदाज काय?

 

पीपल्स पल्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपाच्या नेतृत्वाखालील

युती १७५ ते १९५ जागा

अधिक वाचा  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत! कोणाला पैसे, कोण वंचित निकष काय? सविस्तर वाचा

महाविकास आघाडी ८५ ते ११२ जागा

अपक्ष आणि इतर पक्ष ७ ते १२ जागा जिंकतील.

 

पोलस्टर एक्झिट पोलचा अंदाज काय?

 

भाजपाच्या नेतृत्वाखालील

महायुती १५० ते १७० जागा

महाविकास आघाडी ११० ते १३० जागा

इतर पक्ष ८ ते १० जागा जिंकतील.

 

टाईम्स नाऊ एक्झिट पोलचा अंदाज काय?

 

महायुतीला १०५ ते १२६ जागा

महाविकास आघाडीला ६८ ते ९१

इतर पक्ष आणि अपक्षाला ८ ते १२ जागा मिळतील असा अंदाज आहे.

 

लोकशाही-मराठी रुद्र एक्झिट पोलचा अंदाज काय?

 

महायुतीला १२८ ते १४२ जागा

महाविकास आघाडीला १२४ ते १४० जागा

इतर पक्ष आणि अपक्षाला १८ ते २३ जागा मिळतील असा अंदाज आहे