महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट; राज ठाकरे यांची सडकून टीका…

0

मुंबईः महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडल्यानंतर या कार्यक्रमाला उष्माघातामुळे झालेल्या मृत्यूंमुळे गालबोट लागले आहे. यावरून आता महाराष्ट्र सरकारसह प्रशासनावर नियोजनावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.उन्हाचा कडाका माहिती असतानाही अशा प्रकारे कार्यक्रमाचे आयोजन कसे केले गेले? असे प्रश्न विरोधकांकडून विचारले जात आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही राज्य सरकारवर सडून टीका केली आहे.

खारघरमध्ये आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (ता. १६) महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला लाखो श्रीसेवक आले होते. मात्र उष्माघातामुळे 12 श्रीसेवकांचा मृत्यू झाला. 15 श्रीसेवकांवर कामोठेमधील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. यामुद्द्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. प्रचंड ऊन असल्याने सोहळा संध्याकाळी ठेवावा, हे प्रशासनाला कळलं नाही का? असे म्हणत राज ठाकरे यांनी ट्वीटमधून सरकारवर निशाणा साधला आहे.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार

राज ठाकरे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, “काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेव्हा घोषित झाला तेव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का? कधी नव्हे ते मुंबईतसुद्धा उष्माघाताच्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का?”

“सरकारनं जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही याची काळजी घ्यावी. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे.”, असेही राज ठाकरे ट्वीटमध्ये म्हटले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात जाऊन कालच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आणि सध्या उष्माघातावर उपचार घेत असलेल्या श्रीसेवकांची भेट घेतली. तसेच, त्यांनी विचारपूसही केली.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव