कर्वेनगर प्रभागात मा. महापौर आणि मा. आयुक्त संयुक्त दौरा; नगरसेवक स्वप्नील दुधानेंची ‘सुचक’ मांडणी प्रशासनही भारावले

0

कर्वेनगर प्रभाग क्र. ३०, कर्वेनगर-हिंगणे होम कॉलनी भाग्यातील विविध प्राथमिक समस्यांबाबत स्थानिक नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी वारंवार केलेल्या पाठपुरावा व सूचनांची दखल घेऊन बहुप्रतिक्षित मा. महापौर आणि मा. आयुक्त संयुक्त दौरा आज संपन्न झाला यामध्ये विविध विकासकामे आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्याबाबत नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी पुणे महापालिकेच्या महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांच्यासह आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्या समोर केलेल्या ‘सुचक’ मांडणीमुळे प्रशासनही भारावले.

गेल्या अनेक दिवसांपासून मा. महापौर आणि मा. आयुक्त यांची वेळ मिळावी आणि सदर चर्चा घडून यावी, याकरिता नगरसेवक स्वप्नील दुधाने यांचे प्रयत्न सुरू होते. महापौर मा. मंजुषाताई नागपुरे यांच्यासह आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्यासमोर लोकप्रतिनिधी या नात्याने प्रभागातील नागरिकांच्या विविध समस्या, मागण्या आणि सूचना कानावर घालण्यात आल्याचे स्थानिक नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी सांगितले.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

महापौर मा. मंजुषा नागपुरे व आयुक्त मा. नवलकिशोर राम यांच्या पाहणीत खालील विषयावर चर्चा करण्यात आली…..

  • – राजाराम पूल ते मातोश्री वृद्धाश्रम चौक या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी
  • – शिवणे ते खराडी, महालक्ष्मी लॉन्स, राजाराम पूल ते दुधाने लॉन्स याचसह पुढे शिवणे ते खराडी वारजे महामार्गापर्यंत विकसित करण्यात यावा.
  • – सदर रस्ता विकसित झाल्याखेरीज मुठा नदीवर होणाऱ्या सनसिटी ते कर्वेनगर हा उड्डाणपूल सुरू होऊ नये.
  • – जावळकर वस्ती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकपर्यंत येणारा ३० मी. डीपी रस्ता
  • – जावळकर वस्ती सर्वे नंबर 14 मधील प्लेग्राउंड आरक्षित जागेवर मधील क्रीडा संकुल विकसित करण्याबाबत
  • – तिरुपती नगर येथील अर्धवट रस्ता पुर्ण करण्याबाबत
  • -कर्वेनगर मुख्य एनडीए रस्त्यावर मंजूर मेट्रो अलाईनमेंटच्या अनुषंगाने कर्वेनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याबाबत
  • – कर्वेनगर मुख्य चौकातील उड्डाणपूल वारजे महामार्गापर्यंत जोडण्यात यावा.
  • – कर्वेनगर येथील AJ वृंदावनसमोरील पाणंद रस्ता पूर्ण व्हावा.
  • – प्रभागातील ड्रेनेज समस्यांबाबत
अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

यामध्ये वरील मागण्या समाविष्ट आहेत.

याप्रसंगी मा. महापौर आणि आयुक्त यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच यावर कार्यवाही करण्यात येईल, असा शब्द देण्यात आला असल्याचेही यावेळी मा. स्वप्नील देवराम दुधाने नगरसेवक, सदस्य- शहर सुधारणा समिती, पुणे म.न.पा. सांगितले.