मुख्यमंत्री तुम्ही नवे पुणे पुरंदर विमानतळ शेजारी उभारा; वाढत्या लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी यांच्या सूचना

0

‘पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाढती लोकसंख्या लक्षात घेता भविष्यात या शहरांची क्षमता संपुष्टात येईल. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महामार्ग, उड्डाण पूल आणि मेट्रो प्रकल्प राबविले जात आहेत.मात्र भविष्यात या शहरांवरील लोकसंख्येचा ताण कमी करण्यासाठी पुरंदर विमानतळालगत नवे पुणे वसविण्याचा विचार करावा,’ अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-चाकण-शिक्रापूर या मार्गांवरील उन्नत महामार्गांच्या भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘पुणे हे राज्याच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून, राज्याच्या जीडीपीमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवडचे सुमारे पावणे सात लाख कोटी रुपयांचे योगदान आहे.या शहरांवरील ताण कमी करण्यासाठी पीएमआरडीए क्षेत्रात नवीन टाउनशिप उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, की उन्नत महामार्गांसाठी स्वर्गीय अजित पवार यांच्या दूरदृष्टीमुळे हे महामार्ग विकासाचे ‘गेम चेंजर’ ठरतील.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

नाशिक फाटा-खेडसाठी ‘कोंबडा’ मारला : गडकरी

गडकरी म्हणाले, की नाशिक फाटा-खेड उन्नत महामार्गासाठी आठ हजार कोटींचा डीपीआर तयार आहे. मात्र काही अधिकाऱ्यांनी फाइलवर ‘कोंबडा’ मारल्यामुळे काम रखडले आहे. एका अधिकाऱ्याने शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय निधी देऊ नये, अशी नोंद केल्याने निविदा प्रक्रिया थांबली. त्यावर फडणवीस यांनी आपल्या भाषणात पुढील १५ दिवसांत भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.