फळपीक विमा योजनेसाठी ११ कोटींचा निधी मंजूर

0

पुणे, ता. २ : राज्य शासनाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत मृग बहार हंगाम २०२६ साठी राज्याच्या अग्रिम हिस्सा अनुदानापोटी ११ कोटी १ लाख ९ हजार ४२१ रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम संबंधित विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी योजनेच्या एसक्रो बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

शासन निर्णयानुसार, फळपीक विमा योजनेची सुरळीत अंमलबजावणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून विमा अर्ज स्वीकारण्यापूर्वी मागील मृग हंगामातील देय राज्य विमा हप्त्याच्या ५० टक्के रकमेचा अग्रिम हिस्सा एसक्रो खात्यात जमा करणे आवश्यक आहे. त्यानुसार ही निधी मंजुरी देण्यात आली आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

या निधीचा वापर केवळ मृग बहार हंगाम २०२६ पुरताच मर्यादित राहील. निधीचा खर्च शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार करण्यात येणार असून, कृषी आयुक्तालयामार्फत त्याचे वितरण व नियंत्रण केले जाणार आहे.