पतित पावन संघटनेतर्फे ‘स्मार्ट मीटर’ लावण्यास विरोध; महावितरण पुणे ऑफिस बाहेर स्मार्ट मिटरच्या पोस्टरची होळी

0

पतित पावन संघटनेतर्फे राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहकांवर लादल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटर प्रणालीस तीव्र विरोध व्यक्त करण्यात येत आहे. वीज वितरण कंपन्यांकडून सुरू असलेली स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया ही ग्राहकांच्या हिताविरुद्ध असून यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संघटनेचे म्हणणे आहे की, स्मार्ट मीटरद्वारे वीज बिलांमध्ये अनियमित वाढ, पारदर्शकतेचा अभाव तसेच तांत्रिक त्रुटींमुळे ग्राहकांना अन्याय सहन करावा लागू शकतो. याशिवाय, पूर्वीच्या पारंपरिक मीटर प्रणालीमध्ये असलेली तुलनात्मक स्थिरता आणि विश्वासार्हता याला बाधा निर्माण होत असल्याचेही संघटनेचे मत आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

या पार्श्वभूमीवर पतित पावन संघटनेने आज दुपारी 12 वाजता एम.एस.ईबी च्या पुणे ऑफिस बाहेर स्मार्ट मिटर च्या पोस्टर ची होळी करून आंदोलन करण्यात आले. व मुख्य अभियंता ज्ञानेश्वर पढळकर (मुख्य अभियंता महावितरण) यांना निवेदन देण्यात आले, मुख्य अभियंता यांनी स्मार्ट मीटर ची सक्ती करणार नसल्याची भूमिका मांडून आंदोलनकर्त्यांना आश्वस्त करण्यात आले. जर या पुढे आपले आदेशाने बळजबरीने स्मार्ट मीटर बसवुन नागरिकांना नाहक त्रास दिला तर राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सरकारने या विषयाची गंभीर दखल घेऊन सामान्य वीज ग्राहकांच्या हिताचा विचार करून स्मार्ट मीटर लावण्याच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करावा, अशी संघटनेची ठाम मागणी आहे.
यावेळी संघटनेचे प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, कार्याध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, संघटक गोकुळ शेलार, रवींद्र भांडवलकर, सुनील मराठे, जिल्हाध्यक्ष दिनेश भिलारे, पप्पू टेमघरे, निलेश जोशी, सौरभ पवार, विजय गावडे उपस्थित होते.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

सदर आंदोलन पुणे शहर पालक गिरीश काकडे, शहर अध्यक्ष तेजस पाबळे, कार्याध्यक्ष संतोष गुरु, संघटक विजय क्षीरसागर, राहुल शिंदे, प्रसाद वाईकर, मिलिंद तिकोने, यादव पुजारी, राहुल पडवळ, अण्णा बांगर, संकेत पोटे, नरसिंग कोळी, महेश पाटोळे, योगेश वाडेकर, सचिन येनगुल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.