भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल पहिल्या मजल्याचा भूमिपूजन सोहळा

0

कर्वेनगर प्रभागातील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण प्राप्त व्हावे, याकरिता स्थानिक नगरसेवक स्वप्निल दुधाने यांच्या प्रयत्नातून विकसित झालेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल या शाळेचा पहिला मजल्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष श्री. बाबासाहेब धुमाळ, सहकारी भगिनी सौ. संगीताताई बराटे, मंगेशजी जोशी, सौ. सारिकाताई विजय खळदकर, शिक्षण मंडळाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी श्री. काळे सर यांच्यासह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि विद्यार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सन २०२२ साली लोकार्पण झालेल्या भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल या शाळेने अल्पावधीतच विद्यार्थी आणि पालक वर्गाचा विश्वास संपादन केला असून काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर शहराध्यक्ष आणि माजी आ. सुनिल टिंगरे यांच्या शुभहस्ते पहिल्या मजल्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे. भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुलमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी विद्यार्थी संख्या शाळेसाठी घेतलेल्या परिश्रमांची फलश्रुती असून आज मितीस अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी या ठिकाणी घडत असल्याचे पाहणे नक्कीच सुखावह असल्याचे यावेळी बोलताना स्थानिक नगरसेवक स्वप्निल दुधाने यांनी सांगितले.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

विद्यार्थी वर्गाचा शैक्षणिक याचसह सर्वांगीण विकास व्हावा, याकरिता आपण वेळोवेळी प्रयत्नशील राहिलो असून पहिला मजला विकसित करण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आलो आहोत. लवकरच सदर काम पूर्णत्वास जात असून यामुळे नागरिकांच्या उज्ज्वल भवितव्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे नागरिकांतून संतोष व्यक्त केला जात असून हीच आमच्या कामाची खऱ्या अर्थाने पोहोच पावती असल्याचे स्वप्नील देवराम दुधाने नगरसेवक पुणे म न पा, सदस्य शहर सुधारणा समिती पुणे म न पा यांनी मनोगतात सांगितले.