शिवराज्याभिषेक दिन! एरंडवणे गणेश नगर, लक्ष्मीनगर भागात 51 गणपती मंडळांनी उभारली शिवकश राजदंड स्वराज्य गुढी

0

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र येऊन आपले स्वराज्य उभे केले. सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र आणून आपले स्वराज्य वाढवण्यासाठी टिकवण्यासाठी अतोनात प्रयत्न करून सर्व मराठा साम्राज्य उभे केले. याच प्रेरनेने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाच्या औचित्य साधून आपल्या भागातील 51 गणेश मंडळांमध्ये स्वराज्य गुढी उभारण्याचा संकल्प केला. आणि आमच्या सर्व गणेश नगर एरंडवणे आणि लक्ष्मी नगर भागातील गणेश मंडळांनी आज स्वराज्य गुढी उभारून तो संकल्प पूर्ण केला.

आज छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथे पहिली स्वराज्य गुढी उभारली व 51 गणेश मंडळांनी स्वराज्य गुढी उभारून महाराजांचे विचार समाजात पोहोचवण्याच्या साठी प्रयत्न करून आज एक नवीन आदर्श निर्माण केला. यावर्षी 51 गणेश मंडळांनी या स्वराज्य गुढी उभारली नक्कीच याचे अनुकरण पुढच्या वर्षी 200 गणेश मंडळ स्वराज्य गुढी उभारतील असा निर्धार सर्व गणेश मंडळांनी केला. कार्यक्रमाचे आयोजन श्री सचिन पवार, श्री वैभव दिघे, श्री केदार बलकवडे, शुभम मताळे, श्री समीर येनपुरे, श्री बाळासाहेब दांडेकर, श्री सोमनाथ जाधव यांच्या प्रयत्नातून केले गेले.

अधिक वाचा  भाजपाचे पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी पुण्यावर विशेष लक्ष; कारवाईच्या भीतीने नगरसेवकांचा मतदारांशी संपर्क?

 या उपक्रमामध्ये खालील सर्व गणपती मंडळे सहभागी झाली- 

श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ, देशप्रेमी मित्र मंडळ, ओंकार मित्र मंडळ, गणेश नगर मंडळ, बाल तरुण मंडळ पौड फाटा, कुमार युवक मंडळ, वंदे मातरम मंडळ, अखिल गणेश नगर मंडळ, अमृत मित्र मंडळ, विनायक नवयुग मंडळ, खिलारेवाडी तरुण मंडळ, श्रीराम मंडळ, दक्षिण मुखी मारुती मंडळ, एरंडवने मित्र मंडळ, फ्रेंड्स आर्टस् क्लब, ओम नवनाथ मित्र मंडळ, एकता मित्र मंडळ, उदय हाउसिंग मंडळ, अचानक मित्र मंडळ, विघ्नहर्ता मित्र मंडळ, बालकुमार मित्र मंडळ, भैरवनाथ तरुण मंडळ, नवनाथ मंडळ, श्रीराम भाऊ बोरकर मनसे शाखा, सिद्धिविनायक मित्र मंडळ, लोकमान्य मित्र मंडळ ज्युनियर, लोकमान्य मित्र मंडळ, दशभूजा मित्र मंडळ, जयदीप मंडळ, अचानक मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, एरंडवणे नागरिक संघ, संयुक्त आझाद नगर मंडळ, राजबाग मंडळ, बाल तरुण मंडळ, शिवसेना शाखा अनिल माझीरे, संजय गांधी मित्र मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ म्हाडा कॉलनी विवेक कडू, श्री बालाजी मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळ, नागेश्वर मित्र मंडळ, श्री दत्त मित्र मंडळसंयुक्त लक्ष्मी नगर मित्र मंडळ, अखिल लक्ष्मी नगर मित्र मंडळ, श्री साई मित्र मंडळ, नवयुग मित्र मंडळ सातचाळ गणेश नगर, शहीद मित्र मंडळ, महेश पवळे मित्रपरिवार हे मुलाचे शिवकार्य पार पाडण्यासाठी प्रसाद खुडे, राज पेंढारे कल्पेश गरुड, मयूर बलकवडे, मनीष खैरे, सुनील तेलंग, शुभम, श्लोक बळकवडे यांनी अथक परिश्रम घेतले.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही