60 वर्षांच्या सलमान खानची एकटेपणावर गंभीर पोस्ट, सिक्स पॅक ॲब्स अन् काळजाला भिडणारं कॅप्शन ‘जेव्हा कोणालाच तुमच्यासोबत राहायची इच्छा नसते…’ नक्की घडलं काय?

0

अवघ्या देशाला ज्याच्या लव्ह लाइफमध्ये इंटरेस्ट आहे, तो म्हणजे सलमान खान. वयाची साठी गाठली तरी कोट्यवधी दिलांची धडकन असलेला हा सुपरस्टार आजही सिंगल आहे. सलमान कधी लग्न करणार? हा प्रश्न आता मागे पडला असला, तरी स्वतः सलमानच्या मनात आपल्या सिंगल स्टेटसबद्दल नक्की काय चाललंय, याचा खुलासा नुकताच झाला आहे. बॉलीवूडमध्ये आपण अनेक लग्न आणि अफेअर्सच्या चर्चा ऐकल्या असतील, पण रविवारी संध्याकाळी सलमानने सोशल मीडियावर एक अशी क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने इंटरनेटवर एकच खळबळ उडवून दिली असून चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

सिक्स पॅक ॲब्स अन् काळजाला भिडणारं कॅप्शन

गेल्या काही दिवसांपासून सलमान खान सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह झाला आहे. रविवारी संध्याकाळी त्याने आपल्या ऑफिशियल X आणि इन्स्टाग्राम हँडलवर एक नवा फोटो शेअर केला. या फोटोत नेहमीप्रमाणे शर्टलेस असलेला भाईजान आपले कडक सिक्स पॅक ॲब्स फ्लॉन्ट करताना दिसतोय. पण यावेळी चाहत्यांच्या नजरा त्याच्या पिळदार शरीरापेक्षा, त्याने लिहिलेल्या कॅप्शनवर खिळल्या. या कॅप्शनमध्ये सलमानने एकाकीपणातील कडू वास्तव मांडलं आहे.

सलमान नक्की काय म्हणाला?

आपल्या एकटेपणाबद्दल बोलताना सलमानने लिहिलंय: “माझ्या नजरेत एकटं राहण्याचे दोन मार्ग आहेत- एक म्हणजे एकटा (Alone) आणि दुसरा एकाकीपणा (Lonely). एकटं असणं ही तुमची स्वतःची निवड असते, तुमची मर्जी असते. पण एकाकीपणा तुम्ही तेव्हा फील करता, जेव्हा जगातल्या कोणालाच तुमच्यासोबत राहायची इच्छा नसते. आता या दोन्हीपैकी तुम्हाला काय निवडायचंय, हे तुमचं तुम्हीच ठरवा.”

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण

सलमानची ही पोस्ट काही मिनिटांतच वाऱ्यासारखी व्हायरल झाली. नेहमी आपल्या रफ अँड टफ इमेजमुळे चर्चेत राहणारा सलमान आतून इतका एकटा आहे का? असा प्रश्न आता चाहते विचारत आहेत. काहींनी कमेंट्समध्ये त्याला धीर दिला आहे, तर काहींनी त्याला लग्न करण्याचा सल्ला पुन्हा एकदा दिला आहे.