बारामतीत सुनेत्रा पवारांची ‘एकतर्फी’ घोडदौड; बिचुकले, करूणा शर्मांच्या एकत्र मतांपेक्षा ‘नोटा’ भारी, किती मते?

0

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आता स्पष्ट होऊ लागला आहे.मतमोजणीच्या नवव्या फेरीअखेर अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना 78,528 इतकी मते मिळाली असून त्यांची वाटचाल विजयाच्या दिशेने होत आहे. विशेष म्हणजे, रिंगणात असलेल्या विरोधक उमेदवारांना मतदारांनी सपशेल नाकारल्याचे चित्र दिसत आहे.

विरोधकांपेक्षा ‘नोटा’च सरस

या निवडणुकीत चर्चेत असलेले अभिजीत बिचुकलेआणि करुणा शर्मा यांना मतदारांनी पूर्णपणे नाकारले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या दोन्ही चर्चित उमेदवारांच्या एकत्रित मतांपेक्षा ‘नोटा’ पर्यायाला अधिक मते मिळाली आहेत. चौथ्या फेरी अखेरच्या आकडेवारीनुसार सुनेत्रा पवार यांना एकूण 36,377 मते मिळाली आहेत. तर अभिजीत बिचुकले आणि करुणा शर्मा यांना किती मते मिळाली? याबाबत जाणून घेऊयात…

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

चौथ्या फेरीअखेरची स्थिती

सुनेत्रा पवार (महायुती): 36,377 मते

करुणा मुंडे-शर्मा: 51 मते

अभिजीत बिचुकले: 33 मते

नोटा : 114 मते (NOTA)

मतदानाचा टक्का घसरला, पण पवारांचा प्रभाव कायम

या पोटनिवडणुकीत बारामतीकरांमध्ये काहीसा निरुत्साह पाहायला मिळाला. गेल्या निवडणुकीत 71.86 टक्के मतदान झाले होते, मात्र यावेळी हे प्रमाण 58.27 टक्क्यांपर्यंत खाली आले. एकूण 3 लाख 84 हजार 579 मतदारांपैकी 2 लाख 24 हजार 87 मतदारांनी हक्क बजावला. मात्र, मतदान कमी होऊनही सुनेत्रा पवारांची आघाडी प्रत्येक फेरीगणिक वाढत गेली आहे. पहिल्या फेरीत 6,500 मतांची आघाडी तिसऱ्या फेरीपर्यंत 26,773 वर पोहोचली, तर चौथ्या फेरीत ती 36,377 इतकी झाली आहे.

अधिक वाचा  पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, पुढील आठ महिन्यासाठी पालिकेचे आज कठोर निर्बंध,’या लोकांना पाणी वापरता येणार नाही…

23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने रिंगणात 23 उमेदवार शिल्लक राहिले होते. यात बहुतांश अपक्ष उमेदवार आहेत. बारामतीचा गड पुन्हा एकदा पवार कुटुंबीयांकडेच राहणार असल्याचे सुरुवातीच्या कलांवरून स्पष्ट झाले आहे. आता केवळ सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य किती लाखांवर जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.