सर्वोच्च न्यायालयात ‘फायनल काऊंटडाऊन’ सुरू; शिवसेना कोणाची? ‘या’ तारखेला आरपारची लढाई!

0

शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेस पासून शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरण अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी लवकरच सुनावणी होणार आहे. संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षात जून 2022 मध्ये उभी फूट पडली होती. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 आमदार व13 खासदार यांनी बंद केले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. त्यावेळेसपासून शिवसेना पक्ष, चिन्हावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दावा केला आहे.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

यापूर्वी जानेवारी 2026 मध्ये होणारी सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली होती. आता न्यायालयाने एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा वेळ दिला असून, या आठवड्यात होणारी सुनावणी अत्यंत निर्णायक मानली जात आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरण अंतिम युक्तीवादाच्या टप्प्यावर आले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात या प्रकरणी संगणकीय प्रणालीमार्फत सुनावणीसाठी 29 एप्रिल तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे या सुनावणीत शिवसेना पक्ष, चिन्ह प्रकरणावर निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार