राहुरी पोटनिवडणुकीत सणसणाटी! यांची ‘ED’ पिडा संपली; निकालाच्या टायमिंगची नवी चर्चा नेमकं प्रकरण? 

0

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत उद्याच्या मतदानाच्या तोंडावर निकालाच्या टायमिंगमुळे सणसणाटी पसरली आहे. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरणं, सत्ताधारी भाजपच्या शिष्टाईला होकार देणं आणि यातच सुरू असलेल्या ‘ईडी’ चौकशीचा न्यायालयीन निकाल बाजूने येणं, यावरून या निकालामुळे, राहुरी पोटनिवडणुकीच्या एक दिवस मतदानापूर्वी प्राजक्त तनपुरे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे.

राहुरी विधानसभा मतदारसंघातील माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नागपूर इथं खरेदी केलेल्या साखर कारखान्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरू होती. या चौकशीविरोधात तनपुरे यांनी, उच्च न्यायालयात धाव घेतली होती. ईडीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असतानाच, न्यायालयाकडून तनपुरे यांच्या बाजूने लागला आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

न्यायालयाच्या या निकालामुळे माजी मंत्री तनपुरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या निकाल नेमका, राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीला उद्या (ता. 23) होत असलेल्या मतदानावेळी लागला आहे. तनपुरे उमेदवारी करत नसले, तरी भाजपला मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांचा पाठिंबा लागत आहे.

प्राजक्त तनपुरे या पाठिंब्यावर अजून कोणतेही भाष्य केलेलं नाही. पण ईडी चौकशीमुळे तनपुरे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याचं बोललं जात आहे. यातच न्यायालयाचा हा निकाल आल्याने, या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. या निकालावर तनपुरे काय प्रतिक्रिया देतात, याकडे आता लक्ष लागलं आहे.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत सुमारे 25 हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला आहे. याबाबत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला. नंतर हा गुन्हा ‘ईडी’ने तपासासाठी घेतला. हा सर्व प्रकार सहकारी साखर कारखाना घोटाळा म्हणून ओळखला जात आहे.

तनपुरेंवरील आरोप काय?

प्राजक्त तनपुरे हे राज्यमंत्री होते. राम गणेश गडकरी सहकारी साखर कारखाना तोट्यात निघाल्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्त केला. यानंतर 2012 मध्ये या कारखान्याचा लिलाव जाहीर झाला. हा लिलाव जाहीर झाला, तेव्हा प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खासदार प्रसाद तनपुरे हे बँकेच्या संचालक मंडळावर होते.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

संशयास्पद व्यवहार

कारखान्याचा लिलाव जाहीर केला, तेव्हा कारखान्याची विक्री किंमत 26 कोटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, तनपुरे यांच्या प्रसाद शुगर अँड अलाइड, या कंपनीने तो केवळ 13 कोटी रुपयांना विकत घेतला. हाच व्यवहार ‘ईडी’ला संशयास्पद वाटत होता अन् त्याचीच चौकशी सुरू होती.