अजित पवार अपघात VSR मालकाची CIDसमोर पुण्यात तब्बल तीन दिवस कसून चौकशी खळबळजनक जबाब; विधान परिषद प्रकरणाची चर्चाही 3 दिवस पुढे ढकलली

0

अजित पवार अपघात VSR मालकाची CIDसमोर पुण्यात तब्बल तीन दिवस कसून चौकशी खळबळजनक जबाब; विधान परिषद प्रकरणाची चर्चाही 3 दिवस पुढे ढकलली,

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विधान परिषदेत आज सोमवारी या गंभीर विषयावर चर्चा होणे अपेक्षित असताना, ही चर्चा तीन दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. सत्ताधारी आणि विरोधक, दोन्ही राष्ट्रवादी गट आक्रमक होण्याच्या शक्यतेमुळे ही चर्चा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटलं जातंय. राज्यसभा निवडणूक आणि अर्थसंकल्पीय कामाचे कारण देऊन ही चर्चा लांबणीवर टाकण्यात आली आहे. यावर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

पायलटची चूक! व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा सीआयडीसमोर जबाब

दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाच्या CID तपासादरम्यान मोठी माहिती समोर आली आहे. व्हीएसआर (VSR) कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांची पुण्यात तब्बल तीन दिवस कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान सिंग यांनी धक्कादायक जबाब नोंदवला आहे.

“या अपघाताला पायलट सुमित कपूर याची चूक कारणीभूत आहे”, असा जबाब व्ही. के. सिंग यांनी सीआयडीसमोर नोंदवला आहे. “अजित पवार यांच्या अपघात प्रकरणात माझी चूक असेल तर मला कठोर शिक्षा करा”, असेही व्ही.के.सिंग यांनी म्हटलंय.

व्ही.के.सिंग यांनी दिलेल्या धक्कादायक जबाबामुळे प्रकरणास नवे वळण प्राप्त झालं आहे. अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार आणि पुत्र जय पवार यांनी यापूर्वीच व्हीएसआर कंपनीवर गंभीर आरोप केले असल्याने या जबाबाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली