DGCA अहवालावर थेट छगन भुजबळांचाच सवाल, गुंता वाढणार? मलाही आश्चर्य वाटलं….

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी विमान अपघातात निधन झाले. मुंबईहून बारामतीला जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित दादा VSR कंपनीच्या विमानाने प्रवास करत होते. नुकताच अजित दादांचा लेक जय पवारने सोशल मीडियावर व्हीएसआर कंपनीच्या मालकाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केले आहेत. तसेच DGCAच्या त्या थिअरीचा छगन भुजबळांनी पंचनामा केला आहे.

व्हायरल व्हिडीओ नेमका काय आहे?

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

व्हिडीओमध्ये अजित पवार ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्याचा मालक रोहित सिंह हा मुख्य पायलटच्या सीटवर बसलेला दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विमान आकाशात असताना रोहित सिंह चक्क झोपलेला दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून छगन भुजबळ म्हणाले, व्हायरल होणारा व्हिडीओ अजित दादांच्या विनानातील तो व्हिडीओ नाही. त्यातला असता तर ठार झाला असता. पण ते फार चुकीचे आहे. पायलटच त्या सीटवर बसू शकतो. मालक झोपला असेल तर हा निष्काळजीपणा आणि मजोरेपणा आहे.

DGCA अहवालावर सवाल

DGCA अहवालावर थेट छगन भुजबळांनी सवाल उपस्थित केला आहे. DGCAने सादर केलेल्या प्राथमिक अहवालात विमान लँड होण्यापूर्वी झाडाला आदळले असे सांगण्यात आले आहे. त्यावर भुजबळांनी प्रश्न उपस्थित केला आहे. “मी गेलो होतो तिथं विमान झाडावर आदळले नाही. तिथे कुणीही असे म्हंटलेलं नाही. मलाही आश्चर्य वाटलं झाडावर आदळल्याचं जेव्हा सांगितलं. तसं झालं असतं तर झाडाचे नुकसान झाले असता ना,” असे छगन भूजबळ म्हणाले.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

अजित दादांच्या विमानाच्या CCTV विषयी बोलताना छगन भूजबळ म्हणाले की, “बरोबर आहे. पहिल्यांदा लँड करतांना तो वर गेला होता. दुसऱ्यांदा आला तेव्हा विमान कलले आहे. विमान त्याला सरळ करायला किंवा कंट्रोल करायला वेळ मिळाला नसेल. 10 हजार फुटावर काहीतरी करायला वाव असतो. तो जोरात लॅन्ड करत होता. DGCA जे सांगत आहे त्याची छानबिन होईल.”