अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा? ब्लॅक बॉक्स माहितीचं नेमकं काय? आज DGCA रिपोर्ट अपेक्षित

0

अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अपघात नेमका कसा झाला, याबाबत विविध दावे समोर येत असले तरी अधिकृत खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान, या प्रकरणी डीजीसीए आज सायंकाळपर्यंत आपला अहवाल सादर करणार असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील डीजीसीएचा अहवाल आज सायंकाळपर्यंत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. या अहवालातून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. विशेषतः अपघातामागील तांत्रिक बाबी, ब्लॅक बॉक्समधील नोंदी तसेच कॉकपिटमधील संभाषणाविषयी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काही दिवसांपूर्वी 28 तारखेपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती दिली होती. त्यानुसार आज संध्याकाळपर्यंत हा अहवाल सादर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उद्या अजित पवार यांच्या अपघाताला एक महिना पूर्ण होत असल्याने, आज सायंकाळपर्यंत अहवाल सादर केला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.