वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय मध्यरात्री 100 ठिकाणी धडक कारवाई; आत्ता थेट गुन्हेच दाखल होणार

0

पुणे महापालिकेच्या वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय व अतिक्रमण निर्मूलन विभाग, परिमंडळ ३ यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रभाग क्रमांक 29 व 30 मधील अनाधिकृत पथारीधारकांवर मध्यरात्री कारवाई करण्यात आली. पुणे महापालिकेचे कारवाईचे पथक आगामी काळामध्ये सतत कार्यरत राहणार असून पुणे महापालिकेच्या वतीने सध्या अनाधिकृत पथारी धारक व हॉटेल व्यवसायिक यांच्या विरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे.  वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कारवाई झालेल्या परिसरामध्ये पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट गुन्हे दाखल करण्याच्या तयारीत प्रशासन असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे-धुमाळ यांनी दिली आहे.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील एरंडवणे व कर्वेनगर प्रभागातील मुख्य रस्त्यांवर कारवाई करत हातगाडी ९, इतर २०, सिलेंडर २२, पथारी ४६, काउंपर १ अशी सुमारे 100 अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्यात आली असून यादरम्यान लोखंडी जाल्या १० आता जमा करण्यात आलेल्या आहेत. वारजे कर्वेनगर क्षेत्रिय कार्यालय ह‌द्दीत नदी पात्र, कर्वेनगर डीपी रोड येथे अनधिकृत व्यावसायिकांवर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, बिगारी सेवक अतिक्रमण निरीक्षक श्री मंदार राजकुमार करंजे, सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्री प्रतिक सानप, श्री माधव बहिरम, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक श्री मंथन आमले, श्रीमती आकांक्षा खोडे धनकवडी सहकारनगर क्षेत्रिय कार्यालय, अतिक्रमण विभागाची मदत झाली.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

यामध्ये ५ ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. यामध्ये, लोखंडी जाळ्या, हातगाड्या,, सिलैंडर, पथारी, काउंपर, ऐबल, खुर्ची, पुतळे व्यावसायिक वाहन व इतर साहित्य जप्त करण्यात आले. अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग उप आयुक्त श्री. सोमनाथ बनकर, स.उप आयुक्त तथा मुख्य सुरक्षा अधिकारी डॉ. रमेश शेलार, महापालिका सहाय्यक आयुक्त श्रीमती अस्मिता तांबे-धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली. अनधिकृत अतिक्रमणांवर यापुढे देखील वारंवार व नियमितपणे कारवाई करण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निरीक्षक श्री मंदार राजकुमार करंजे यांनी सांगितले.