मतदारांनो गोंधळू नका… गट अन् गणातील उमेदवारांची नावे असणार ‘या’ दोन रंगात

0

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. यावेळी मतदारांचा गोंधळ उडू नये म्हणून निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरची विशिष्ट रचना केली आहे. वरच्या बाजूस पांढऱ्या रंगात गटांतील उमेदवारांची नावे असतील. त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगात गणातील उमेदवारांची नावे असणार आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया सुलभ होणार आहे.

गटांच्या उमेदवारांसाठी बॅलेट पेपरचा वरचा भाग पांढऱ्या रंगाचा आहे. त्याखाली एक ओळ सोडून गुलाबी रंगाच्या बॅलेट पेपरवर पंचायत समिती गणातील उमेदवारांची नावे असणार आहेत. त्यामुळे मतदारांना योग्य ठिकाणी मतदान करणे सोपे जाणार आहे.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

उमेदवार जास्त असल्यास दोन यंत्रे

एका मतपत्रिकेवर पंधरा उमेदवार आणि नोटा असे सोळा पर्याय असतात. त्यापेक्षा जास्त नाव असल्यास दोन मतदान यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. याबाबत कर्मचाऱ्यांमार्फत मतदारांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले आहे.

दि. ७ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान प्रक्रिया आहे. नागरिकांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे गट आणि गणासाठी निर्भयपणे मतदान करून लोकशाहीचा उत्सव साजरा करावा.

 – प्रांताधिकारी