सुनेत्रा वाहिनीकडे ‘या’ खात्याची जबाबदारी; अर्थबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अद्याप हिरवा कंदील नाहीच!

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा साधेपणात शपथविधी पार पडला. शपथविधीनंतर अवघ्या दोन तासांतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खातेवाटप जाहीर केले.

सुनेत्रा पवारांकडे कोणती खाती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यावर पुढील तीन खात्यांची जबाबदारी सोपवली आहे. क्रीडा विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग या तीन खात्याची जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्यावर सोपवली आहे. अजित पवार यांच्याकडे असलेले वित्त (अर्थ) व नियोजन खाते सध्या सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. अर्थखात्याबाबत भाजपच्या वरिष्ठ पातळीवर अद्याप हिरवा कंदील नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.

अधिक वाचा  चांदणी चौकातून कोथरूडच्या मुख्य मार्गावर बसेस, जड वाहनांना बंदी; डुक्कर खिंड, वारजे जंक्शनमार्गे पर्यायी वाहतूक

फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सध्या कोण कोण आहेत?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – गृह, ऊर्जा, कायदा, सामान्य व्यवस्थापन, माहिती आणि इतर शिल्लख खाती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास आणि गृहनिर्माण (सामाजिक उपक्रम)

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – क्रीडा, राज्य उत्पादन शुल्क विभाग

1)चंद्रशेखर बावनकुळे – महसूल

2) राधाकृष्ण विखे पाटील- जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ)

3)हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण

4) चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाज

5) गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

6) गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा

7) गणेश नाईक – वन

8) दादाजी भुसे – शालेय शिक्षण

9) संजय राठोड – माती व पाणी परीक्षण

10) दत्तात्रय भरणे – कृषिमंत्री

11) मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन

12) उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा

13) जयकुमार रावल – पणन, राजशिष्टाचार

14) अदिती तटकरे – महिला व बालविकास

15) शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम

17) जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज

18) नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन

19) संजय सावकारे – कापड

अधिक वाचा  वारं फिरलं, ‘या’ जिल्ह्यांत पावसाची धुव्वादार बॅटिंग, IMD चा अलर्ट; विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत

20) संजय शिरसाट – सामाजिक न्याय

21) प्रताप सरनाईक – परिवहन

22) भरत गोगावले – रोजगार हमी, फलोत्पादन

23) मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन

24) नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे

25) आकाश फुंडकर – कामगार

26) बाबासाहेब पाटील – सहकार

27) प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

28) पंकजा मुंडे – पशु संवर्धन, पर्यावरण, वातावरण बदल

29) अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास, उर्जा नूतनीकरण

30) अशोक उईके – आदिवासी विकास

31) शंभूराज देसाई – पर्यटन, खाण, व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय

32) आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान