पुणे पोलिस दलात खळबळ! वाघोली जमीन घोटाळा, वरिष्ठ पोलिस निरीक्षकावर गुन्हा

0

जमिनीच्या वादात आर्थिक फायद्यासाठी पदाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. वाघोलीत १० एकर जमीन प्रकरणात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. चंदननगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांडगे यांच्यासह चार जणांच्या विरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुण्यातील वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून फौजदारीपात्र रचून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी करून ती मूळ जमिनीची मालक असल्याच्या भासविण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाशी देखील हे प्रकरण संबंधित असल्याचे बोलले जाते आहे. आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहे. या प्रकरणात वरीष्ठ पोलिसाचा संबंध आल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. वाघोली येथील 10 एकर जमिन हडपण्याच्या उद्देशाने कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

अधिक वाचा  अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीत ९१.०८ टक्के मतदान; शांततेत निर्भय वातावरणात मतदान प्रक्रिया पार

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, 2022-23 मध्ये वाघोली येथील 10 एकर जमीन हडपण्यासाठी लांडगे यांच्या नेतृत्वात कट रचण्यात आला. अर्चना पटेकर या महिलेला अर्पणा यशपाल वर्मा असे नाव धारण करायला सांगून तीच मूळ जागा मालक आहे, असे भासवण्यात आले. वर्मा हिच्या नावाचे बनावट दस्त नोंदणीसाठी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड तयार करुन जमिनीचे खरेदी खताचे दस्त तयार केले.

हा प्रकार समोर आल्यानंतर लांडगे यांनी जमिन हडपण्याचे उद्देशाने संगनमत करून स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता बनावट महिला उभी केली असल्याचे समोर आले. यात पुण्यातील एका बड्या बांधकाम व्यवसायाचाही संबंध असल्याचे सांगितले जाते. मात्र याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. या प्रकरणात आतापर्यंत आनंद लालासाहेब भगत, शैलेश सदाशिव ठोंबरे, राजेंद्र लांडगे, अपर्णा यशपाल वर्मा या चौघांवर चंदननगर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

चंदननगर पोलिसांचे एक तपास पथक आता या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत आहेत. पुणे पोलिसांची प्रतिमा डागाळणारे एकापेक्षा एक प्रकरण मागील काही दिवसांपासून बाहेर येत आहेत. यात अगदी पोर्श कार अपघात प्रकरणापासून ते गजा मारणेसोबत मटण पार्टी करण्याच्या प्रकरणांचा समावेश आहे. अशात पोलीस जमीन विक्री रॅकेटमध्ये सहभागी असल्याचे उघड झाले आहे.

चंदननगर पोलिसांनी याप्रकरणी तपास पथक स्थापन केले असून, गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी सखोल चौकशी सुरू आहे. बनावट कागदपत्रे, संगनमत आणि आर्थिक व्यवहार यांचा तपास करण्यावर पोलिसांचा भर आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा अशा प्रकरणात सहभाग असल्याने पुणे पोलिस दलाची प्रतिमा डागाळल्याची चर्चा आहे. नागरिकांनी या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणात पारदर्शक तपासाचे आश्वासन दिले आहे, तर लांडगे आणि इतर आरोपींवरील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत