संयुक्त कारवाई करून परतताना नक्षलवाद्यांचा हल्ला, सात जवान शहीद; IED ब्लास्टने लष्कराचं वाहन उडवलं

0

रायपूर : छत्तीसगढमधील बीजापूरमध्ये नक्षलवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. जवानांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनावर नक्षलवाद्यांनी ब्लास्ट केला आहे. या सात ते आठ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. सोमवारी ६ जानेवारी रोजी कुटरू भागात ही घटना घडली. नक्षल ऑपरेशन विवेकानंद सिन्हा यांनी सांगितलं, की नक्षलवाद्यांनी सोमवारी दुपारी २.१५ वाजता हा हल्ला केला.

बस्तरच्या महानिरीक्षकांनी जवानांचं वाहन उडवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. नक्षलवाद्यांच्या या हल्ल्यात किती जवान शहीद झाले याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सातहून अधिक जवान शहीद झाले आहेत.

अधिक वाचा  राज्यात ऑक्टोबरच्या शेवटी हवामान बदल येथे ‘अवकाळी’ची शक्यता; दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात आसुसलेल्या आशा पालवल्या

बीजापूरमध्ये झालेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं आहे. सोमवारी कुटरू भागात नक्षलवाद्यांनी जवानांच्या चिलखती वाहनाला लक्ष्य केलं. नक्षलवाद्यांनी वाहनावर IED ब्लास्ट करत स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे. या स्फोटात काही जवान शहीद झाले आहेत. इतर अनेक जवान गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे.

जवानांना घेऊन जाणाऱ्या लष्काराच्या वाहनावर ज्यावेळी नक्षलवाद्यांनी हल्ला केला, त्यावेळी जवान ऑपरेशनवरुन निघाले होते. बस्तरच्या महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवादी हल्ल्यात दंतेवाडातील ८ जवान शहीद झाले आहेत. या हल्ल्यात जवानांना घेऊन निघालेल्या वाहनाच्या ड्रायव्हरचाही मृत्यू जाला आहे. हे सर्व जवान दंतेवाडा, नारायणपूर आणि बीजापूरमध्ये संयुक्त कारवाई करून परतत होते.

अधिक वाचा  देवेंद्र फडणवीसांनी 25 किलो वजन 56व्या वर्षी कसं कमी केलं? त्यांच्या फिटनेसच्या सहज सुलभ गोष्टी सर्वांना शक्य