महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री शिंदेच राहणार की नाही?; अमित शाहांची थेट हिंट…

0

केंद्रात आणि राज्यातही महायुती सरकार सत्तेत असताना लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बाजी मारली. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार? याची उत्सुकता आहे. राज्यात जर पुन्हा महायुतीचं सरकार सत्तेत आलं तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहणार की मुख्यमंत्रिपदी दुसऱ्या कुणाची वर्णी लागणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी हिंट दिली आहे. भाजपच्या अधिनेशनात बोलताना अमित शाह यांनी यंदाच्या विधानसभेच्या निवडणुकीवर भाष्य केलं आहे.

महायुतीचं सरकार सत्तेत येणार- अमित शाह

अधिक वाचा  पुणे, संभाजीनगर, नागपूर… पदवीधरांनी महायुतीला हादरवले, मविआची सरशी, असा आहे संपूर्ण निकाल

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचंच सरकार सत्तेत येणार असल्याचं अमित शाह यांनी ठणकावून सांगितलं आहे. आज मी सांगतोय ते लक्षात ठेवा. महाराष्ट्रात यंदा प्रचंड बहुमतासह महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे. भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार येणार आहे. माझे शब्द नीट लक्षात घ्या. भाजपच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार सत्तेत येणार आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे