पुणे पुन्हा अल्पवयीन मुलाकडून अपघात वाहने चिरडली; सकाळी व्यायामाला बाहेर पडलेल्या 2 मुलीही टँकरखाली

0

पुण्यातील कल्याणीनगर येथे अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दोघांना चिरडल्याच्या घटनेवरून सुरू असलेला गदारोळ अद्यापही शमलेला नाही. या भीषण अपघाताच्या स्मृती ताज्या असतानाच पुण्यात पुन्हा असाच एक अपघात घडला असून त्यासाठीही एक अल्पवयीन मुलगा जबाबदार आहे. सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना एका टँकरने चिरडलं. पुण्यातील वानवडी येथे हा भीषण अपघात घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे हा टँकर अवघा 15वर्षांचा मुलगा चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत काही मुलं जखमी झाली असून एक दुचाकीवरील महिलादेखील जखमी झाली आहे. आज (शनिवार) सकाळी 6.30 च्या सुमारास हा अपघात घडल्याचं समजतं.

अधिक वाचा  बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना उच्च न्यायालयाचा दिलासा मालमत्ता जप्तीचा आदेशही रद्द; नियमित कायदेशीर व्यवहार म्हणजे ‘किकबॅक’ नव्हे

या अपघातानंतर संतप्त नागरिकांनी हा टँकर अडवून धरला असून चालकाला पकडून ठेवले आहे. अतशिय अवजड टँकर अवघ्या 15वर्षांच्या मुलाच्या ताब्यात देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. नागरिकांनी या अल्पवयीन मुलाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.  सैफ पठाण असे या टँकर चालकाचे नाव असून तो अवघ्या 15  वर्षांचा आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणाच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी तो टँकरही ताब्यात घेतला आहे. या टँकरचा मूळ मालक, महिंद्रा बोराटे याला देखील पोलीस चौकशीसाठी बोलावणार आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

अधिक वाचा  महामानव विचार मंच संस्थेच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न

मिळालेल्या माहितीनुसार, कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी हे दुचाकीवरून जात होते. तर त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या काही मुली व्यायामासाठी रस्त्यावरून धावत होत्या. टँकरची दुचाकीला धडक बसताच त्यांची पत्नी दुचाकीवरून उडून थेट समोर रस्त्यावर पडली. तर, टँकरखाली दोन मुली आल्या. स्वतः ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. अपघातातील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.