हा आपल्या शेतकरी माय-बापांचा अर्थसंकल्प आहे; देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांना चोख प्रत्युत्तर दिलं

0

मुंबई : विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या अंतरिम अर्थसंकल्पावर विरोधकांनी केलेल्या टीकेला फडणवीसांनी उत्तर दिलं आहे. या अर्थसंकल्पात थापा मारण्यात आल्या असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली होती. त्याला उत्तर देताना हा थापांचा नव्हे तर आपल्या माय-बापांचा अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, “अजित पवारांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी प्रगतीशील सर्वसमावेशक असं बजेट आज मांडलं. शेतकरी, महिला युवा, मागासवर्गीय, सर्व घटकांना समर्पित असा हा अर्थसंकल्प आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, हा थापांचा अर्थसंकल्प आहे पण हा माय-बापांचा अर्थसंकल्प आहे”

आता विरोधीपक्ष बोलत होते त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांचे चेहरे उतरलेले होते, केवळ टीका करत होते. हा अर्थसंकल्प महाराष्ट्रात इतिहास निर्माण करणार आहे. आम्ही जे जे कबूल केलं आहे ती प्रत्येक गोष्ट वेळेत पूर्ण करुन दाखवून देऊ. हा निर्धाराचा अर्थसंकल्प आहे निवडणुकीचा नाही, असं सांगताना विरोधक आपल्याला काय बोलायचंय हे आधीच लिहून आणतात, अशा शब्दांत फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?