पुण्यात वातावरण पुन्हा तापलं आरोपीच्या नावे ‘रॅपसाँग’ समर्थकांची पत्रकारांना धक्काबुक्की! आज मोठं आंदोलन

0

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवाल प्रकरण चर्चेत असताना एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरूण रॅप साँग गात असलेला दिसत असून त्यामध्ये तो रॅपमधून लोकांना शिव्या देत आहे. या रॅप साँगमध्ये, हो मी बिल्डरचा पोरगा आहे म्हणून बेलवर सुटलोय, असं म्हणत त्यानंतर रॅपमधील तरूण अत्यंत खालच्या पातळीवर जात शिवीगाळ करत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. व्हिडीओमधील तरूण परत एकदा रस्त्यावर उतरण्याची भाषा करत आहे. व्हिडीओमध्ये लोकांना शिवीगाळही केली जात आहे. मात्र हेरॅप साँग वेदांत अग्रवाल याचं नसल्याचा दावा त्याच्या वकील आणि कुटुंबियांनी केला आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

या प्रकरणामधील आरोपी वेदांत अग्रवाल याला 14 दिवस बाल कारागृहात ठेवण्यात आलं आहे. पोलिसांनी त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना ताब्यात घेतलं आहे. पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये विशाल अग्रवाल, सुरेंद्र अग्रवाल आणि अपघात झाला त्यावेळी गाडीत असलेला ड्रायव्हर यांची एकत्र चौकशी होणार आहे. कारण जबाबात एकसूत्रता आहे का हे पाहण्यासाठी तिघांची चौकशी केली जाणार आहे.

पुण्यामध्ये अग्रवाल यांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना धक्काबुक्की केली. यावरून पुण्यातील काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी थेट पुणे पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी पैसे खाल्ले म्हणून अग्रवाल कुटुंबाची एवढी डेरिंग होतीय. पुण्यात पत्रकाराला मारहाण होतीय हे दुर्दैव आहे. आयुक्तांनी कारवाई करावी अन्यथा आज आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!