पुणे काँग्रेसच्या आशा पल्लवित? पटोलेंचा प्लॅन काय? ‘रविभाऊ’साठी विदर्भाच्या 10 आमदारांचा पुण्यात तळ

0

पुणे लोकसभा मतदारसंघात येत्या 13 मे ला मतदान पार पडणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीकडून काँग्रेस पक्षाला सुटली आहे. काँग्रेसकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र धंगेकर निवडून यावेत यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चांगलीच कंबर कसली आहे. विशेष म्हणजे रविंद्र धंगेकर यांचं काम करत असताना नाना पटोले यांना काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी बघायला मिळाल्याची चर्चा आहे. यामुळेच नाना पटोले यांनी आपली स्वत:ची एक टीमच पुण्यात उतरवल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. नाना पटोले यांनी विदर्भातील काँग्रेसच्या तब्बल 10 आमदारांना पुण्यात आणलं आहे. हे सर्व आमदार पुण्यात सलग 5 दिवस तळ ठोकून असणार आहेत. हे सर्व आमदार थेट पक्षाला रिपोर्ट देणार आहेत.
रविंद्र धंगेकर यांच्यासाठी स्वत: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लक्ष ठेवून आहेत. पक्ष संघटनात्मक बांधणी, प्रचाराची यंत्रणा कशा पद्धतीने राबवावी याचं नियोजन नाना पटोले यांनी हातात घेतलेलं आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात मतदान पार पडलं आहे. त्यामुळे नाना पटोले यांनी विदर्भातील आमदारांना पुण्यात आणलं आहे. काँग्रेसमध्ये देखील एक अंतर्गत गटबाजी दिसत आहे. त्याचा फटका बसू नये, स्वत:ची एक टीम असावी यासाठी नाना पटोले यांनी लक्ष घातलेलं आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

विदर्भातील ‘हे’ आमदार पुण्यात
विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यात तळ ठोकून बसणार आहेत. हे सर्व 10 आमदार पक्षाला रिपोर्ट सादर करणार आहेत. काँग्रेस आमदारांची टीम पुण्यात दाखल होत आहे. रवींद्र धंगेकर यांच्यासाठी विदर्भातील काँग्रेसची टीम सज्ज होणार आहे. काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे नाना पटोले यांनी स्वतःची टीम मैदानात उतरवली आहे. या आमदारांमध्ये यशोमती ठाकूर, सुनील केदार, धीरज लिंगडे, अभिजित वंजारी, विकास ठाकरे, अमित झनक, राजू आवळे, नाना पटोले यांचा समावेश आहे. हे सर्व आमदार दररोज पक्षाला रिपोर्ट देणार आहेत. हे सगळे आमदार ५ दिवस पुण्यात तळ ठोकून बसणार आहेत.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

काँग्रेसला चांगले दिवस येणार?
रविंद्र धंगेकर हे गेल्यावर्षी पोटनिवडणुकीत आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर पक्षाने त्यांना थेट पुणे लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली. इथे त्यांची लढत भाजपचे उमेदवार मुरलीधर मुधोळकर यांच्यासोबत होत आहे. या निवडणुकीत कुणाचा विजय होईल ते 4 जूनला स्पष्ट होईलच. पण शरद पवार यांनी नुकतंच एका मुलाखतीत केलेल्या वक्तव्यामुळे शरद पवार यांचा चांगले दिवस येतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार यांनी प्रादेशिक पक्षांबाबत केलेलं वक्तव्य खरं ठरलं तर काँग्रेस पक्षाला आगामी काळात चांगले दिवस येऊ शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान