मोठी बातमी! लोकसभा रणधुमाळीतच महाराष्ट्रात पुन्हा आणखी एका निवडणुक; हे आमदार पुन्हा कामाला?

0

लोकसभा निवडणुकीच्या पाठोपाठ आता महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. विधान परिषदेच्या दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघ आणि कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ या दोन जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. तसेच नाशिक आणि मुंबईच्या शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या चारही जागांवरील विद्यमान आमदारांचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलैला संपपुष्टात येणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या दोन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या चारही जागांसाठी 10 जूनला मतदान पार पडणार आहे. तर 13 जूनला मतमोजणी होणार आहे. मुबंई पदवीधर मतदारसंघावर सध्या विलास पोतनीस हे विद्यमान आमदार आहेत. कोकण विभाग पदवीधर मतदारसंघावर निरंजन डावखरे हे विद्यमान आमदार आहेत. नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघावर किशोरे दराडे हे विद्यमान आमदार आहेत. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील हे विद्यमान आमदार आहेत. या सर्व आमदारांचा विधान परिषदेचा कार्यकाळ हा येत्या 7 जुलै 2024 ला संपणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून या चार जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल?

या निवडणुकीसाठी 15 मे ला नोटीफिकेशन

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 मे 2024

अर्जांची छाननी 24 मे 2024

अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 27 मे 2024 ही असणार आहे. यानंतर 10 जून 2024 ला मतदान पार पडेल. तर 13 जून 2024 मतमोजणी केली जाईल. 18 जून 2020 पर्यंत ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

काही महिन्यांपूर्वी पाच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पार पडली तेव्हा नाशिक आणखी दोन जागांवर महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरस बघायला मिळाली होती. नाशिकच्या जागेची तर चांगलीच चर्चा होती. यावरुन काँग्रेसमध्ये धुसफूस बघायला मिळाली होती. आता या निवडणुकीत काय-काय राजकीय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अधिक वाचा  दुसरी पसंती ठरवणार पुण्याचा शिक्षक आमदार, नेमकं गणित काय? निकालाआधीच सोप्या शब्दात समजून घ्या