शरद पवारांनी मानले PM मोदींचे आभार; सगळ्या आरोपातून पक्षाला मुक्त केलं याचा आनंद

0

अजित पवारांनी बंड करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयाच्या उपस्थितीत राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या राजकीय भुकंपानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवारांच्या शपतविधीनंतर शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले आहेत.

शरद पवार म्हणाले की, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी काँग्रेस पक्षाविरोधात आणि त्यानंतर राष्ट्रवादी पक्षाबद्दल वक्तव्य केलं होतं. त्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष असल्याचे सांगितले होते. हे सांगत असताना त्यांनी राज्य सहकारी बँकेचा उल्लेख केला तसेच सिंचन विभागाबद्दल जी तक्रार होती याचा उल्लेख केला. यासोबत त्यांनी राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे असा उल्लेख केला होता.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; ‘पदवीधर’मध्ये मात्र सलग दुसऱ्यांदा पराभव

पवार पुढे म्हणाले की, मला आनंद आहे की आज मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली याचा अर्थ त्यांनी केलेला आरोप वास्तव नव्हते. या सगळ्या आरोपातून पक्षाला आणि ज्यांच्या बद्दल त्यांनी आरोप केले होते, त्या सगळ्यांना मुक्त केलं यासाठी मी प्रधानमंत्र्यांचा आभारी आहे असे शरद पवार म्हणाले.
या पूर्वकल्पना नव्हती

आज राजभवन येथे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून तर इतर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतीली आहे. दरम्यान शरद पवारांनी या सर्व घडामोडींची कुठलीही माहिती नव्हती, तसेच अजित पवार यांच्यासोबत देखील कुठलीही चर्चा झाली नाही हे यावेळी स्पष्ट केलं. शपथविधीपूर्वी फक्त भुजबळांशी बोलणं झालं होतं असेही शरद पवारांनी सांगितले.

अधिक वाचा  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5 हजारांची अग्रिम मदत! कोणाला पैसे, कोण वंचित निकष काय? सविस्तर वाचा

‘या’ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
अजित पवार छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ धनंजय मुंडे धर्माराव अत्राम
आदिती तटकरे संजय बनसोडे अनिल पाटील