राजस्थानच्या फलंदाज आरसीबीसमोर ‘नांगीच’ टाकली, आरसीबीच्या ऐतिहासिक विजयाची नोंद

0

राजस्थान रॉयल्स टीमला आयपीएल 16 व्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्धच्या सामन्यात निराशाजनक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. आरसीबीने राजस्थानवर तब्बल 112 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. आरसीबीने पहिले बॅटिंग करत राजस्थान रॉयल्स टीमला विजयासाठी 172 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र राजस्थानच्या फलंदाजांनी आरसीबीच्या गोलंदाजांसमोर नांगी टाकली. राजस्थान अवघ्या 59 धावांवर 10.3 ओव्हरमध्ये ऑलआऊट झाली. आरसीबीला या 112 धावांच्या फरकामुळे पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फायदा झाला आहे. तसेच आरसीबीने प्लेऑफच्या दिशने एक पाऊल पुढे टाकलं आहे.

राजस्थानची 172 धावांचं पाठलाग करताना अतिशय वाईट सुरुवात झाली. आरसीबीने राजस्थानला पहिल्याच बॉलपासून धक्के द्यायला सुरवात केली. या सुरुवातीपासून राजस्थानच्या 2 फलंदाजांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. दुहेरी आकडा सोडा, एकूण 4 जणांना भोपळाही फोडता आला नाही.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

आरसीबीचा विजयी क्षण….

राजस्थानकडून शिमरॉन हेटमायर याने सर्वाधिक 35 धावांची खेळी केली. जो रुट याने 10 धावा केल्या. तर कॅप्टन संजू सॅमसन आणि देवदत्त पडीक्कल या दोघांनी 4 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. एडम झॅम्पा याने 2 रन्स केल्या. तर ध्रुव जुरेल 1 रनवर आऊट झाला. तर संदीप शर्मा झिरोवर नाबाद राहिला.

आरसीबीकडून वेन पार्नेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मायकल ब्रेसवेल आणि कर्ण शर्मा या दोघांनी प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेर पाठवलं. तर मोहम्मद सिराज आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांनी 1 विकेट घेतली.

आरसीबीची बॅटिंग

दरम्यान त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. आरसीबीने राजस्थान रॉयल्स टीमला विजयासाठी 172 धावांचं आव्हान ठेवलं. आरसीबीने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. आरसीबीकडून कॅप्टन फाफ डु प्लेलिस आणि ग्लेम मॅक्सवेल या जोडीने अनुक्रमे सर्वाधिक 55 आणि 54 धावांची अर्धशतकी खेळी केली.

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

महिपाल लोमरुर 1 धाव करुन बाद झाला. दिनेश कार्तिक भोपळाही फोडू शकला नाही. तर अखेरच्या काही षटकांमध्ये अनुज रावत याने काही फटके मारुन आरसीबीला 170 पार पोहचवलं. अनुज रावत याने 11 बॉलमध्ये 29 धावा केल्या. तर एम ब्रेसवेल याने नॉट आऊट 9 रन्स केल्या.

राजस्थानकडून केएम आसिफ आणि एडम झॅम्पा या जोडीने प्रत्येकी दोघांना आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर संदीप शर्मा याने 1 विकेट घेतली.

आरसीबीची पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उडी

आरसीबीला राजस्थानवर 112 धावांच्या फरकाने विजय मिळवल्याने मोठा फायदा झाला आहे. आरसीबीने या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्ये थेट सातव्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. आरसीबीचा नेट रन रेट हा आता +0.166 असा आहे. आरसीबीचा या सामन्याआधी नेट रन रेट हा -0. 345 असा होता. तर राजस्थानला पराभवाचा मोठा फटका बसला. राजस्थानची पाचव्यावरुन सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

अधिक वाचा  Fssaiची घटनाबाह्य समांतर अंमलबजावणी यंत्रणा; तुकाराम मुंडेची थेट मुंबई हायकोर्टात धाव, अधिकार हिरावून घेतले नेमका दावा काय?

राजस्थान रॉयल्स प्लेइंग इलेव्हन | संजू सॅमसन (कॅप्टन आणि विकेटकीपर), यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, जो रूट, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, अॅडम झम्पा, संदीप शर्मा, केएम आसिफ आणि युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु प्लेइंग इलेव्हन | फाफ डू प्लेसिस (कॅप्टन), विराट कोहली, अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल, वेन पारनेल, कर्ण शर्मा, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.