शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये पुन्हा दाखल; नरेंद्र मोदींकडून शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस सुप्रिया सुळेंची माहिती

0

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात तपासण्यांसाठी दाखल करण्यात आलं आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. शरद पवार यांना सकाळीच पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पुढील तपासण्यांसाठी शरद पवार यांना दाखल केलं असल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल

खासदार सुप्रिया सुळे यांनी आम्ही बाबांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत, असं स्टेटसच्या माध्यमातून कळवलं आहे. शरद पवार यांना आज सकाळीच पुण्यातील रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. आता पुन्हा पुढील तपासण्यांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवार यांना अखेर आज रुबी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दोन दिवस उपचार घेतल्यानंतर पवारांना रुग्णालयातून सोडण्यात आलं. वातावरण बदलल्यामुळे शरद पवार यांना छातीत कफ झाला होता, यानंतर डॉक्टरांनी शरद पवार यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता.

अधिक वाचा  CET पेपरफुटी स्टिंग ऑपरेशन लाखोंची मागणी व्हिडीओ रोहित पवारांकडून ट्वीट यांची थेट चंद्रकांत पाटलांच्या राजीनाम्याची मागणी

शरद पवार हे दुष्काळ पाहणीसाठी दौऱ्यावरती होते, त्यादरम्यान त्यांना हवामान बदलामुळे कफ आणि अशक्तपणा जाणवू लागला होता. त्यामुळे त्यांचा दुष्काळ पाहणी दौरा रद्द करण्यात आला, त्यानंतर त्यांना रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं.

रुबी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतल्यानंतर शरद पवार यांना व्हील चेअरवरुन बाहेर आणण्यात आलं. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना हात उचांवून पवार यांनी इशारा केला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले होते.

नरेंद्र मोदींकडून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोनवरुन शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची माहिती पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी दिली. यावेळी मोदी यांनी शरद पवार यांना प्रकृतीची काळजी घेण्याचं आवाहन केलं.

अधिक वाचा  एमपीएससी पेपरफुटी तुकाराम मुंढे ‘ॲक्शन’मध्ये!१६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे आवाहन थेट; ‘या’ ९ परीक्षांची कसून चौकशी होणार