बौद्धजन सहकारी संघाच्या वतीने वर्षावास मालिकेचा सांगता समारोह मोठ्या उत्साहात संपन्न 

0

गुहागर दि. १ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी गाव व मुंबई सलग्न संस्कार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत वर्षावास मालिकेचे आयोजन करण्यात आले होते, या वर्षावास मालिकेचा सांगता समारोह मुंबई शाखेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. १ नोव्हेंबर २०२६ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह जानावळे (शृंगारतळी) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

सदर प्रसंगी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करण्यात आली, तद्नंतर संस्कार समितीचे अध्यक्ष शशिकांत जाधव आणि सहकारी यांनी आपल्या सुमधुर वाणीने सूत्तपठण केले, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गमरे यांनी आपल्या भारदस्त आवाजात लाघवी भाषाशैलीत केले, सदर प्रसंगी मध्यवर्ती गाव कमिटी अध्यक्ष सुरेश सावंत आणि मुंबई संघाचे चेअरमन दीपक मोहिते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

अधिक वाचा  पुणे पाणीटंचाई महापौरांचा ‘ॲक्शन प्लॅन’ ! आत्ता शहरात २४ तास ‘पाणीटंचाई व आपत्ती नियंत्रण कक्ष’ कार्यरत

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात तळवली आरोग्य केंद्र येथील तज्ञ डॉक्टर सीमा जाधव, डॉ. गीता कराड, अजय हळदे, हर्षदा सत्तावडेकर, विजया शिंदे, अमृता जानवळकर तसेच नेत्र चिकित्सक डॉक्टर जोशी सर आणि त्यांची संपूर्ण टीम आदी आरोग्य सेवक, सेविका यांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले त्या शिबिरात जवळपास तीनशे नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. सदर प्रसंगी मुंबई विभागाचे उपाध्यक्ष अरविंद जाधव, चिटणीस अनुराग जाधव, धर्मानंद जाधव, खजिनदार अजित पवार, विभाग अधिकारी दीपक सावंत, प्रदीप मोहिते, सचिन गमरे, गाव मध्यवर्ती कमिटीचे कार्याध्यक्ष मारुती मोहिते, विश्वस्त पराग सावंत, शंकर मोहिते, सात ही विभागाचे विभाग प्रतिनिधी, विविध शाखा, त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अध्यक्षीय भाषणात अशोक कदम यांनी दोन्ही सत्रातील हा कार्यक्रम खेळीच्या वातावरणात उत्साहात संपन्न झाला त्याकरता गाव आणि मुंबईच्या कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम त्याबद्दल त्यांचे आणि उपस्थितांचे त्यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.

अधिक वाचा  महाराष्ट्र जीएसटी संकलनात देशात अव्वल! ४ वर्षांतील सर्वाधिक २३ टक्क्यांची वाढ; सलग चौथ्या महिन्यात २ लाख कोटी संकलन