पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

0

पुणे : पुणे विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी निर्णायक आघाडी घेत विजयाच्या उंबरठ्यावर धडक मारली आहे. पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत हर्षदा देशमुख यांना तब्बल १ लाख १२ हजार ३७७ मते मिळाली असून, विजयासाठी आवश्यक असलेला १ लाख १३ हजार ११३ मतांचा कोटा गाठण्यासाठी त्यांना केवळ ७३६ मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे आता त्यांच्या विजयाची केवळ अधिकृत औपचारिक घोषणाच बाकी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मतमोजणीची सद्यस्थिती आणि मतांचा कोटा पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांत झालेल्या या मतदानात एकूण २ लाख २६ हजार २२४ मते वैध ठरली आहेत.

अधिक वाचा  केंद्र सरकारचा मोठा निर्णय निर्बंध हटवले, चांदी स्वस्त होणार… सहा महिन्यांसाठी 6500 मेट्रिक टन चांदी आयातीला मंजुरी

वैध मते : २,२६,२२४

विजयासाठी आवश्यक कोटा : १,१३,११३ मते (वैध मतांच्या ५०% + १ मत)

हर्षदा देशमुख यांना मिळालेली मते : १,१२,३७७

विजयासाठी उर्वरित मते : अवघी ७३६ मते

विजयाचा निश्चित कोटा आणि मिळालेली मते यांत नाममात्र अंतर असल्याने एलिमिनेशन फेरीतील दुसऱ्या पसंतीच्या मतांमधून हा कोटा अगदी सहज पूर्ण होईल, असा विश्वास राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

तब्बल १७,२९९ मते ठरली अवैध!

सुशिक्षित आणि पदवीधर मतदारांच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अवैध मतांचा आकडा पुन्हा एकदा धक्कादायक ठरला आहे. मतमोजणीदरम्यान तब्बल १७ हजार २९९ मतपत्रिका बाद (अवैध) ठरल्या आहेत. पसंतीक्रम नोंदवताना मतदारांकडून झालेल्या चुका आणि मार्गदर्शक सूचनांचे योग्य पालन न केल्यामुळे बाद मतांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समोर आले आहे. ही बाद मते वगळूनच वैध मतांच्या आधारे १ लाख १३ हजार ११३ चा कोटा निश्चित करण्यात आला.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

विधान परिषदेत शरद पवारांचे संख्याबळ वाढणार या निवडणुकीत भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना मैदानात उतरवून जोरदार ताकद लावली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या हर्षदा देशमुख यांनी सुरुवातीपासूनच भक्कम आघाडी कायम ठेवली.