सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

0

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राजकीय तडजोडींचे गणित जुळल्याने २१ पैकी 15 जागा बिनविरोध होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज सोसायटी गटांत मात्र निवडणुकीचा सामना रंगणार आहे. या निवडणुकीतील जागावाटपासाठी आज सकाळपासून जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर प्रमुख नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये झालेल्या तडजोडीमुळे बहुतांश जागांवरील संघर्ष टळल्याचे चित्र आहे. येत्या 1 नोव्हेंबरला मतदान होणार असून 3 रोजी मतमोजणी होईल.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी आज दिवसभर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर खलबते सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, खासदार विशाल पाटील, ऋतुराज देशमुख, पृथ्वीराज पाटील, राहुल महाडिक, विश्वजीत कदम, सम्राट महाडिक, इंद्रिस नायकवडी, महेंद्र लाड आणि अमोल बाबर यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रमुख नेते उपस्थित होते. विविध पक्षांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेतून जागावाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

जिल्हा बँकेच्या २१ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपला चार, राष्ट्रवादी काँग्रेसला सात, काँग्रेसला सहा, अजित पवार गटाला एक आणि शिवसेना शिंदे गटाला तीन जागा देण्याचे सूत्र ठरले. या तडजोडीतून 15 जागांवरील निवडणुकीचा पेच सुटला असून, जत, मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, अनुसूचीत जाती आणि भटक्या जाती जमाती या गटांत थेट लढती होणार आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जागावाटपाच्या तडजोडीने 15 जागांवरील संघर्ष टळल्याचे चित्र असले, तरी 6 ठिकाणी होणाऱ्या लढतींमुळे निवडणुकीतील राजकीय उत्सुकता कायम आहे.

जागावाटपासाठी दिवसभर खलबते

जिल्हा बँकेवरील वर्चस्वासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता होती. मात्र, प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून जागावाटपाचा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर झालेल्या चर्चेत विविध पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या चर्चेमुळे अनेक जागांवरील संभाव्य संघर्ष टाळण्यात यश आल्याचे चित्र आहे.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

पक्षनिहाय जागावाटप पक्ष आणि जागा

  • भाजप 5
  • राष्ट्रवादी काँग्रेस 7
  • काँग्रेस 5
  • राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) 1
  • शिवसेना (शिंदे गट) 3

      एकूण 21

बिनविरोध निवड झालेले 15 उमेदवार:-

  • 1. पृथ्वीराज पाटील
  • 2. वैभव शिंदे
  • 3. राहुल महाडिक
  • 4. महेंद्र लाड
  • 5. अमोल बाबर
  • 6. तानाजी पाटील
  • 7. विश्वजित कदम
  • 8. देवराज पाटील
  • 9. रणधीर नाईक
  • 10. विराज नाईक
  • 11. पुजा पाटील
  • 12. अपर्णा देशमुख
  • 13. सतिश देशमुख
  • 14. वर्षा सावंत
  • 15. नितिन होनराव

अशा होणार लढती

  • जत : आमदार गोपीचंद पडळकर विरुद्ध विनोद पवार.
  • मिरज – आण्णासाहेब कोरे विरुद्ध अनिल शेगुणशे.
  • तासगाव – सुमन पाटील विरुद्ध संजय पाटील
  • कवठेमहांकाळ- अजितराव घोरपडे विरुद्ध टी.व्ही.पाटील.
  • अनुसूचीत जाती – के. डी. कांबळे विरुद्ध प्रताप मधाळे, बेले
  • भटक्या जाती जमाती – संभाजी कचरे विरुद्ध अमित पारेकर
अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?