गोकुळ दूध संघ निवडणुकीत निकालात आता हाती आलेल्या निकालावरुन आमदार सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. समविचारी आघाडीच्या विजयाचेचित्र स्पष्ट होऊ लागताच सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली आहे. अजिंक्यतारा परिसरात पाटील समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.
महायुतीच्या नेत्यांना ठरावधारकांनी जोरदार धक्का देत गोकुळमध्ये सतेज पाटलांचीच शिट्टी वाजवली. भंडारा, शपथा याला बळी न पडता ठरावधारकांनी दिग्गज नेत्यांना घरचा रस्ता दाखवला. या निवडणुकीत महायुतीचे दिग्गज नेते एकत्र असतानाही काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी एकाकी झुंड देत विजयी बाजी मारली आहे.
मात्र मतमोजणीच्या अंतिम निकालाकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. समविचारी आघाडीच्या उमेदवारांची आघाडी कायम राहिल्याने सतेज पाटील समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आघाडी कायम राहिल्यास सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळमध्ये एकहाती सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. मात्र, अंतिम निकालानंतरच गोकुळच्या सत्तेचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.



