पुण्यातील अनेक पदांमध्ये फेरबदल ८ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

0

राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेला गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील ८ वरिष्ठ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत.८ जुलै २०२६ रोजी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये काही महत्त्वाच्या महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि महानगरपालिकांच्या आयुक्तांचा समावेश आहे.

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची परंपरा या आठवड्यात देखील कायम राहिली आहे. फडणवीस यांनी राज्याचे सूत्रे हातात घेतल्यापासून कॅबिनेट बैठकीच्या दिवशी वा आसपास आठ-दहा अधिकाऱ्यांच्या बदल्याचे आदेश जारी होतात. या आठवड्यात देखील बदल्यांची परंपरा कायम राहिली आहे.

अधिक वाचा  शिवसेना शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला फडणवीसांचा हा शब्द, जरांगेंकडून शेअर ऑडिओ क्लिपच्या चौकशीची मागणी

कुठे कोणाची झाली बदली?

१. रुपेश जयवंशी (IAS:२००९)

पुणे येथील ‘महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे’ व्यवस्थापकीय संचालक रुपेश जयवंशी यांची मुंबईतील ‘महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या’ व्यवस्थापकीय संचालकपदी बदली करण्यात आली आहे.

२. श्रीधर दुबे (IAS:२०१४) .

यापूर्वी १९ मे २०२६ रोजी त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला होता, त्यात अंशतः बदल करण्यात आला आहे. आता श्रीधर दुबे यांची नवी मुंबई येथील ‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (NRLM) च्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

३. निलेश सागर (IAS:२०१५)

नवी मुंबईच्या ‘राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान’ (NRLM) चे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची आता पुणे येथील ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या’ आयुक्तपदी बदली झाली आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

४. जगदीश मिनीयार (IAS:२०१५)

पुण्याचे महिला व बालकल्याण आयुक्त जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथे सिडकोचे (CIDCO) मुख्य प्रशासक (नवीन शहरे) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

५. श्रीमती वर्षा लड्डा (IAS:२०१५)

अमरावती महानगरपालिकेच्या महिला महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा यांची पुण्याच्या महिला व बालकल्याण आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

६. डॉ. मंगेश गोंदवले (IAS:२०१५)

गेल्या २३ जून २०२६ रोजी काढण्यात आलेल्या आदेशात बदल करून, डॉ. मंगेश गोंदवले यांची आता अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे.

७. पंकज देवरे (IAS:२०१६)

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

मुंबईतील ‘महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे’ सचिव पंकज देवरे यांची एमएमआरडीए (MMRDA) मुंबई येथे ‘सह महानगर आयुक्त’ (Joint Metropolitan Commissioner) या अत्यंत महत्त्वाच्या पदावर बदली झाली आहे.

८. डॉ. मंजिरी मानोलकर (IAS:२०१६)

पुण्याच्या ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या’ आयुक्त डॉ. मंजिरी मानोलकर यांची पुणे येथील ‘महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या’ व्यवस्थापकीय संचालकपदी (MD) वर्णी लागली आहे.

दरम्यान, आगामी काळातील प्रशासकीय आव्हाने आणि विविध विभागांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी हे फेरबदल करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते.