बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र. ३ यांच्या विद्यमाने १३५ व्या भीम महोत्सवाचे मुंढर गावी आयोजन

0

गुहागर दि. ८ (रामदास धो. गमरे) बौद्धजन सहकारी संघ गिमवी विभाग क्र. ३ तालुका गुहागर जिल्हा रत्नागिरी व शाखा क्र. २४, मौजे गाव मुंढर यांच्या संयुक्त विद्यमाने राजेश मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार दि. १२ मे २०२६ रोजी भीम महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रवी यशवंत जाधव व राजेश सिताराम मोहिते हे करतील, तर पाहुण्यांचे स्वागत दर्शन तुकाराम गमरे व विनोद गंगाराम मोहिते हे करतील, कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज गमरे व सुनील पवार हे करणार असून सदर कार्यक्रमांतर्गत खेळ खेळूया पैठणीचा सन्मान करू वहिनींचा हा होम मिनिस्टर कार्यक्रम विशाल गमरे व राजेश मोहिते यांच्या सूत्रसंचलनात सानिका सचिन गमरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. सोबतच डॉ. सचिन ओक व डॉ. अश्विनी ओक, भूषण पवार, सागर सुर्वे, सुनील पवार यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पुणे विधानपरिषद आमचे दोन्हीही उमेदवार उच्चशिक्षित मोठ्या फरकाने विजयी होणार; गोकुळवरून चंद्रकांत पाटलांनी ट्रोलर्संनाही सुनावलं

संध्याकाळी सभेचे आयोजन करण्यात आले असून मान्यवरांचा सत्कार, विद्यार्थ्यांचा सत्कार आणि मरणोत्तर पुरस्कार यांचे वितरण करण्यात येईल, सायंकाळी ४:०० ते ६:०० भव्यदिव्य धम्मरॅली काढण्यात येईल तसेच शाखा अंतर्गत लकी ड्रॉचे अध्यक्ष अनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली वितरण करण्यात येईल, रात्री ठीक १०:०० वाजता अरविंद मोहिते प्रस्तुत बहुजनांची प्रेरणा, धम्मपद वाद्यवृंद एक धम्मदेसना ऑर्केस्ट्रा संकल्पना दिग्दर्शन अरविंद मोहिते, निवेदिका अर्चना मोहिते यांचे आयोजन करण्यात आले आहे सदर कार्यक्रमास तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, मुंबईचे चेअरमन दिपक मोहिते, चेअरमन मारुती मोहिते, दिलीप मोहिते, गावशाखा सचिव सुनील गमरे, दीपक मोहिते, संदेश जाधव, रुपाली गमरे, प्रमोदशेठ गांधी (सदस्य जिल्हापरिषद रत्नागिरी), मंगेश जोशी (सदस्य, पंचायत समिती गुहागर), परिक्षीत पाटील (तहसीलदार, गुहागर), परेश क्षीरसागर (गट विकास अधिकारी, गुहागर), प्रकाश शिर्के (तंटा मुक्ती, मुंढर), सचिन सावंत (पोलिस निरीक्षक, गुहागर), डॉ. प्रकाश शिर्के (सामाजिक कार्यकर्ते), सागर जाधव, प्रभाकर शिर्के (माजी सदस्य, पंचायत समिती, गुहागर) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

तरी विभागातील सर्व शाखा त्यांचे पदाधिकारी, महिला मंडळ, उपासक उपासिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या शाखा क्र. २४ मौजे मुंढर यांनी काढलेल्या परिपत्रकात निलेश गमरे यांनी म्हटले आहे.