मालेगाव स्फोट ‘मुक्तते’नंतर कर्नल पुरोहितांचे प्रमोशन; थेट ब्रिगेडियर पदी पदोन्नती; कारकिर्दीचा नवा टप्पा सुरू

0

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी प्रदीर्घ कायदेशीर लढा देणारे कर्नल श्रीकांत पुरोहित यांना भारतीय लष्करात मोठी बढती मिळाली आहे. सशस्त्र बल न्यायाधिकरणाने दिलेल्या निकालानंतर लष्कराने त्यांना ‘ब्रिगेडियर’ पदावर पदोन्नत करण्यास मंजुरी दिली आहे. कर्नल पुरोहित ३१ मार्च २०२६ रोजी लष्करी सेवेतून निवृत्त होणार होते, मात्र त्यांच्या निवृत्तीला आता स्थगिती देण्यात आली आहे.

२००८ च्या मालेगाव स्फोट प्रकरणात नाव आल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे लष्करी करिअर पूर्णपणे ठप्प झाले होते. ९ वर्षे तुरुंगात काढल्यानंतर २०१७ मध्ये त्यांना जामीन मिळाला आणि ते पुन्हा लष्करात रुजू झाले. मात्र, त्यांच्या बढतीचा आणि सेवाज्येष्ठतेचा प्रश्न प्रलंबित होता. जुलै २०२५ मध्ये मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता केली. यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये त्यांना ‘कर्नल’ पदावर बढती मिळाली होती.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

कर्नल पुरोहित यांनी आपल्या ज्युनिअर अधिकाऱ्यांच्या बरोबरीने प्रमोशन आणि इतर फायदे मिळावेत यासाठी सशस्त्र बल न्यायाधिकरणाकडे दाद मागितली होती. जस्टिस राजेंद्र मेनन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने १६ मार्च २०२६ रोजी निकाल देताना म्हटले की, “पुरोहित यांचा पदोन्नतीवर असलेला दावा न्याय्य आहे.” त्यांच्या तक्रारीचे निवारण होईपर्यंत त्यांची निवृत्ती स्थगित ठेवण्याचे आदेशही न्यायाधिकरणाने दिले होते.

कारकिर्दीचा नवा टप्पा

भारतीय लष्कराच्या सूत्रांनुसार, ही बढती म्हणजे कर्नल पुरोहित यांच्या तुरुंगवास आणि खटल्यादरम्यान वाया गेलेल्या वर्षांची एक प्रकारे भरपाई आहे. जर त्यांची कारकीर्द व्यत्ययाविना सुरू राहिली असती, तर आज ते मेजर जनरल पदापर्यंत पोहोचले असते. आता ब्रिगेडियर म्हणून ते एका वरिष्ठ कमांडरच्या जबाबदारीत पुन्हा एकदा सक्रिय होतील.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार