सातत्याने कार्य मग्न रोप्य महोत्सवी कार्यकर्त्यांची साधना शत प्रतिशत भाजपा ‘स्वीकृत’साठी दखल घेणार का?

0

पुणे शहरामध्ये नुकत्याच पार पडलेल्या पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष विक्रमी मताधिक्यांनी यशस्वी झाला. कायम कार्यकर्त्यांवर अतोनात प्रेम करणारा पक्ष म्हणून ज्या पक्षाची ओळख आहे त्या पक्षात गेली 20 25 वर्ष अहोरात्र काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना यावेळी तरी संधी मिळेल की पुन्हा त्यांच्या नशिबी निराशाची येणार ही नवी चर्चा सध्या पुणे शहरात सुरू झाली आहे. पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाची विचारधारा प्रसारित करण्यासाठी रस्त्यावर, व्यासपीठावर आणि विविध समाज माध्यमांवर पक्षाची भूमिका कायमच ठामपणे मांडणारे निष्ठावान कार्यकर्ते पक्षीय गणितामध्ये उमेदवारी मिळवण्यास यशस्वी झाले नसले तरीसुद्धा तीन दशके पक्ष कार्य त्याग सातत्य आणि समर्पण या भूमिकेतून करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या ‘…. पराभूत नव्हे निष्ठित कार्यकर्ता!’ विधानाने अपेक्षा वाढलेल्या आहेत.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा

पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे विविध भागातील किमान दहा ते बारा असे चेहरे आहेत कि, ज्यांनी कायमच आपलं कुटुंब म्हणून पक्ष कार्याला अहोरात्र वाहून घेतलं, विचारधारेचा प्रचार प्रसार केला, प्रमुख दावेदारी असतानाही पक्ष निर्णयाला साथ दिली, नेतृत्वाच्या निर्णयाला विजयी करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली ‘राष्ट्र प्रथम’ विवेकी विचाराने सुमारे डझनभर कार्यकर्ते संपूर्ण पुणे शहरात आजही संधीच्या प्रतीक्षेत पक्षकार्यात आपला आयुष्य (व्यक्ती विशेष न वाटण्यासाठी कोणत्याही कार्यकर्त्याचा नाम उल्लेख करण्यात आलेला नाही) अर्पित करत आहेत. आजही या त्यागी समर्पित भूमिकेमुळे कोणत्याही नेत्याकडे मागणी करण्यास सुद्धा या निष्ठावान कार्यकर्त्यांना जाणे सुद्धा नियमबाह्य वाटत असताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घेतलेली भूमिका आशा पल्लवीत करणारी वाटत आहे.

अधिक वाचा  विधान परिषद 5 जागांसाठी आज मतदान 182 उमेदवार रिंगणात; सर्वत्र बंडखोरीची धास्ती पण ‘मैत्रीपूर्ण’ लढतचा मुलामा!

पुणे शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने रणनीतीचा भाग म्हणून विविध प्रवेश आणि विद्यमान 40 नगरसेवकांना घरचा रस्ता दाखवण्याचे काम केले. पक्षाचे ध्येय धोरण म्हणून हे सर्व घडत असताना निष्ठावान कार्यकर्ता संधी मिळो न मिळो पक्षाला विजयी करण्यासाठी कष्ट घेतानाच दिसला आहे. हडपसर कोथरूड खडकवासला कसबा शिवाजीनगर वडगाव शेरी सर्वत्र अशा निष्ठावान कार्यकर्त्यांची फळी आता स्वीकृतच्या सदस्यत्व पदासाठी इच्छुक झाली असून आपापल्या परीने कार्याची पावती देण्यासाठी नेतृत्वाकडे मागणी करत आहेत.