मोरया मित्र मंडळ संस्कृती जोपसनारे मंडळ: स्वप्नील दुधाने

0

पुणे शहरातील कर्वेनगर भागामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीची जोपासना करून नव्या पिढीमध्ये संस्कृतीची बीजे रुजवण्यासाठी मोरया मित्र मंडळाचे अनमोल योगदान असून नव्या तरुण पिढीचा हा चमू या भागातील संस्कृती टिकवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी कायमच कार्यरत राहत आहे. मोरया मित्र मंडळ संस्कृती जोपसनारे मंडळ असून परिसरातील अन्य मंडळांनी यापासून दीक्षा घेण्याची गरज असल्याचे नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नील दुधाने यांनी म्हटले आहे. मोरया मित्र मंडळ कर्वेनगर वतीने गणेश जन्म सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता .यावेळी नगरसेवक स्वप्नील देवराम दुधाने बोलत होते.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!

” हळदकुंकू हा समारंभ स्त्रियांमधील बंध दृढ करतो आणि प्रेम, आनंद व सकारात्मकतेचा संदेश देतो. तिळगुळाच्या गोडव्याप्रमाणे आपल्या भागातील नागरीकांचे नातेही गोड राहो, “आपले हे नाते असेच टिकून राहो, आपापसातील प्रेम आणि सलोखा वाढत राहण्यासाठी, सुखी आणि समृद्ध आयुष्यासाठी सर्व एकत्र येऊन नवीन वर्षाची सुरुवात नवचैतन्यात करावी म्हणून ह्या हळद कुंकू समारंभाचे दरवर्षी मोरया मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येते असे प्रतिपादन कार्यक्रमाचे आयोजक मोरया मित्र मंडळ संस्थापक केदार वसंत मारणे यांनी केले.

तसेच होम हवन, महाप्रसाद, महाआरती चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंडळाचे जेष्ठ नागरिक निजाप्पा वाघमारे, सुभाष भवर, शिवाजी बोरकर, महादेव शिनगारे यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक स्वप्नील दुधाने यांचा पुस्तक, शाल श्रीफळ देऊन नागरी सत्कार करण्यात आला.

अधिक वाचा  एसएनडीटी मेट्रो स्टेशन वाहतूक कोंडी मुक्त? ‘या शासकीय जागेचा वापर करा’ पुनीत जोशी यांची आयुक्तांकडे ठोस मागणी

यावेळी माजी नगरसेविका सौ लक्ष्मीताई दुधाने विजय खळदकर, संगिता बराटे, निवेदिता जोशी, शैलेश जोशी, समिता थोरवे मंडळाच्या कमल गायकवाड, स्वाती दारवटकर, संगिता भरम, रेणुका जावळे, सुरेखा जोशी,वर्षा शिगवन, मनिषा जावळे, ललिता नवघणे, अंजली साकळे, उपस्थित होते.