प्रभाग क्रमांक १० बावधन- भुसारी कॉलनी अभिवादन रॅलीही भव्य दिव्यचं!; अनोख्या प्रचार सांगतेमुळे परिसरात चर्चा!

0

पुणे शहराचे पश्चिमद्वार प्रभाग क्रमांक १० बावधन- भुसारी कॉलनी मधील भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्यासाठी घरोघरी प्रचार पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज प्रचाराची सांगता अभिवादन रॅलीने करण्याचे नियोजन केले. तुमची आमची भाजपा सर्वांची! अशी भूमिका सर्व कार्यकारिणी घेतल्यामुळे अभिवादन रॅली सुद्धा भव्य दिव्य झाली असून परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाची वातावरण पोषक होण्यास मदत झाली आहे.  या प्रभागातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला संधी दिल्यापासून आज पुन्हा मतदान होईपर्यंत सर्वच लोकप्रतिनिधी जनसंपर्कात असल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने या भागामध्ये मतदारांची पसंती मिळवण्यास मदत होत आहे.

अधिक वाचा  पुण्यात ७५ किलोमीटर लांबीचे नवे सायकल ट्रॅक उभारणार; महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे निर्देश

भारतीय जनता पक्षाच्या वतीने कोणत्याही आरोप प्रत्यारोपांना प्राधान्य न देता फक्त आणि फक्त विकासाची चर्चा आणि सेवेची संधी या दोनच गोष्टींना प्राधान्य दिल्यामुळे प्रचाराची रणनीती आखण्यात आल्यामुळे प्रभागातील विजयाची गणिते जुळवण्यास भारतीय जनता पक्षाला मदत झाल्याची जाणीव होत असल्याचे मत अधिकृत उमेदवार व्यक्त करत आहेत. कायम जनसेवेत असलेल्या भारतीय जनता पक्षाला आव्हान देण्याचे नियोजन विरोधकांनी केले परंतु फक्त निवडणुकीपुरती जनता! अशी भूमिका घेतल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विक्रमी मताधिक्य मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी, विजयी चौकार साकार केलेले विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांच्या त्रिवेणी संगमाने प्रचाराची रणनीती आखत केलेल्या नियोजनामुळे परिसरातील प्रचाराचा वेग वाढला आहे.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

प्रभाग 10 बावधन भुसारी कॉलनी प्रभागातील शिंदे पेट्रोल पंप, एन.डी.ए. पाषाण रोड, बावधन, पुणे ते बांदल धनकुडे प्लाझा परिसर, उजवी भुसारी कॉलनी, कोथरूड, पुणे (शिंदे पेट्रोल पंप- एल.एम.डी. चौक- हायवे सर्व्हिस रोड- पेबल्स अर्बनिया सोसायटी – बावधन बुद्रुक गावठाण- बावधन खुर्द गावठाण- डी. पॅलेस हॉटेल- डी. एस. के. रानवारा रोड- चेलाराम हॉस्पिटल- बांदल इस्टेट- रियाण इंटरनॅशनल स्कुल- एस.एन.बी.पी. स्कुल- एलोरा वाईन्स – चांदणी चौक- लोहिया जैन आयटी पार्क-रॉयल एनफील्ड बुलेट शोरूम- बोरसे हॉस्पिटल- संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळ- सावरकर मैदान- न्यू इंडिया स्कुल- जनसेवा बैंक – ओंकार मित्र मंडळ इंदिरा शंकर नगरी मेट्रो डेपो- पोलीस स्टेशन- आशिष गार्डन चौक- कुमार परिसर डीपी रस्ता- महात्मा सोसायटी मुख्य गेट- जिजाई गार्डन भुजबळ टाउनशिप- एकलव्य कॉलेज चौक- भारती नगर- कोथरूड डेपो चौक- कुंदन शोरूम-शृंगेरी मठ- श्री. दत्त सेवा मंडळ- क्रांती मित्र मंडळ – बांदल धनकुडे प्लाझा परिसर) उत्साही पदाधिकाऱ्यांच्या सहभागामध्ये संपन्न करण्यात आली.

अधिक वाचा  पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील मतमोजणी कशी होते? प्रथम पसंतीत विजय झाला नाही तर पर्याय काय? सविस्तर वाचा