राष्ट्रवादीच्या माजी शहराध्यक्षाच्या मुलावर गुन्हा दाखल, मुलाच्या सासऱ्यावरही गुन्हा; बलात्कार प्रकरणातील आरोपीकडून…. 

0

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी शहर अध्यक्ष दीपक मानकर यांचा मुलगा करण दीपक मानकर तसेच करण याचे सासरे सुखेन शाह यांच्यावर देखील बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. समर्थ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात करण दीपक मानकर, शंतनू सॅम्युअल कुकडेसह इतरांवर गुन्हा दाखल आहे. याबाबत वरिष्ठ निरीक्षक उमेश गित्ते यांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिसांत रेड हाऊस फाउंडेशनचा शंतनू कुकडे याच्यावर अल्पवयीन मुलीच्या अत्याचारप्रकरणी पहिला गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सामूहिक बलात्काराचा दुसरा गुन्हा नोंदला गेला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कुकडे व रोनक जैन याच्या बँक खात्यावरून लाखोंचा आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले. त्यासंदंर्भाने चौकशी सुरू केली असता दीपक मानकर, करण दीपक मानकर आणि सुखेन सुरेशचंद्र शहा यांच्या बँक खात्यावर लाखो रुपयांचा व्यवहार झाला असल्याचे समोर आले.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार

पोलिसांनी करण व सुखेन शहा याच्याकडे आर्थिक व्यवहाराबाबत चौकशी केली. तेव्हा करण मानकर याने सांगितले की, डोणजे याठिकाणी दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी शंतनू कुकडे हा करण मानकरला पाच कोटी रुपये कर्ज स्वरूपात देणार होता. हे कर्ज पुढील ४० वर्षांसाठी होते. त्यासंदंर्भाने ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा झाला आहे, अशी माहिती दिली. पोलिसांनी यासंदंर्भाने चौकशी केली असता हे दस्त बनावट तयार केल्याचे समोर आले असून, जो दस्त क्रमांक करण यांनी पोलिसांना दिला, तो दस्त क्रमांक एका वेगळ्याच व्यक्तीने नियमानुसार खरेदी केला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी करण मानकर याच्यासह इतरांवर गुन्हा नोंदवला आहे.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

सुखेन शाहच्या खात्यावर ६ कोटी ५२ लाख

सुखेन शाह यांच्या मुलाच्या नावे पिंपरीत रिसॉर्ट करायचे असल्याचे सांगत शंतनू कुकडेकडून सहा कोटी ५२ लाख रुपये घेतले. त्याबाबत ५०० रुपयांच्या स्टँप पेपरवर करारनामा केला होता. मात्र, तो करारनामा केलेला दस्त देखील बनावट असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. पोलिसांकडे दाखल केलेला दस्त क्रमांक हा दुसऱ्याच व्यक्तीला वितरित करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यानुसार याप्रकरणात सुखेन शाह यांच्यासह रौनक जैन, शंतनू कुकडे व इतरांवर स्वतंत्र गुन्हा नोंदवला आहे.