उद्धव ठाकरेंचा स्थानिकच्या ‘मिनी विधानसभे’चा मास्टरप्लॅन रेडी; मातोश्रीवर काय ठरलं? ‘या’ नेत्यांवर मोठी जबाबदारी

0

काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने येत्या ४ महिन्यांच्या आत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले. त्यामुळे आता ‘मिनी विधानसभे’साठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटानेदेखील आपली रणनीती ठरवण्यास सुरुवात केली आहे. पक्षातील मोठ्या नेत्यांवर विविध जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

मातोश्रीवरील बैठकीमध्ये काय ठरलं?

शनिवारी, शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीनंतर नेते, उपनेते आणि राज्य संघटक यांच्यावर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जबाबदारी देण्यात आली आहे.जबाबदारी देण्यात आलेल्या भागाची माहिती तसेच स्थानिक पातळीवर वॉर्ड अथवा कोणते मतदार संघ लढायला हवेत याची देखील माहिती मागवण्यात आली असून याचा अहवाल 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

काय आहे उद्धव ठाकरेंचा मास्टरप्लॅन ?

राज्यात शिवसेना ठाकरे संघटन मजबूत आहे का? याची माहिती तसेच 2012 आणि 2017 च्या महापालिकेच्या मतदार संघात कोणत्या स्थितीत आहेत याची माहिती जमा करण्यात येणार आहे. शहरांमध्ये शहरप्रमुख, उपशहर प्रमुख, प्रभागप्रमुख, 2 वार्डसाठी उपविभागप्रमुख आणि प्रत्येक वॉर्डसाठी शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात तालुकाप्रमुख, उप तालुकाप्रमुख, गावपातळीवर शाखाप्रमुख, बूथप्रमुख आणि 10 जणांची टीम तयार करण्यात येणार आहे. या संघटनात्मक रचना पूर्ण करून यादीचा अहवाल आणि आपल्या स्थानिक भागातील कोणते वार्ड अथवा मतदार संघ लढवणे आवश्यक आहे याची माहिती 19 जूनपर्यत शिवसेना भवन येथे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

‘या’ नेत्यांवर सोपवली जबाबदारी

सुभाष देसाई, राजन विचारे: ठाणे, नवी मुंबई, मीरा भायंदर

संजय राऊत: पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, मालेगाव, जळगाव शहर

अनिल परब, संजय राऊत:  धुळे, अहिल्यानगर

अनिल परब: कल्याण-डोंबिवली

अनंत गीते: उल्हासनगर, पनवेल शहर – अनंत गीते

अरविंद सावंत: अमरावती, अकोला – अरविंद सावंत

भास्कर जाधव :नागपूर, चंद्रपूर – भास्कर जाधव

विनायक राऊत: वसई-विरार शहर, भिवंडी निजामपूर शहर

चंद्रकांत खैरे: लातूर, सोलापूर – चंद्रकांत खैरे

अंबादास दानवे: परभणी, जालना, नांदेड-वाघाळा शहर

सुनील प्रभू: कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, मिरज आणि कुपवाड

अधिक वाचा  जरांगेंच्या जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; शिष्टमंडळालाही हे आश्वासन?

छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे, अनिल देसाई, अंबादास दानवे