बीआरएस पक्षाला महाराष्ट्रातील पहिलं यश, निवडणुकीतील राज्यातील पहिला उमेदवार विजयी

0

राज्याच्या राजकारणात नव्याने एन्ट्री करणाऱ्या भारत राष्ट्र समिती पक्षाला (बीआरएस) अखेर राज्यात पहिलं यश मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीचं निकाल आज आला असून, गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे. गफार सरदार पठाण असे बीआरएसच्या विजयी उमेदवाराचं नाव आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बीआरएस पक्षाची जाहीर सभा झाली होती.

बीआरएस पक्षाला राष्ट्रीय स्थरावर वाढवण्यासाठी के.चंद्रशेखर राव यांच्याकडून प्रयत्न केले जात आहे. दरम्यान यासाठी त्यांनी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सभा देखील घेतल्या आहे. तर आगामी सर्वच निवडणुका लढवणार असल्याचं निर्णय देखील या पक्षाकडून घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ग्रामपंचायतीसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत देखील बीआरएस पक्षाचे कार्यकर्ते रिंगणात उतरले होते. तर गुरुवारी (18 मे) झालेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचे आज निकाल हाती आला असून, छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर तालुक्यातील आंबेलोहळ गावात ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत बीआरएसचं उमेदवार विजयी झाला आहे. गफार सरदार पठाण असे बीआरएसच्या विजयी उमेदवाराचं नाव आहे. विशेष म्हणजे राज्यातील बीआरएस पक्षाचा हा पहिला विजय असल्याचे बोलले जात आहे.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील सर्वच 288 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर नांदेड येथे आयोजित करण्यात आले आहे. नांदेड शहरातील अनंता लॉन्स येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 19 ते 20 मे असे दोन दिवसीय हे शिबीर असणार असून, यासाठी स्वतः के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे उपस्थित राहणार आहे. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीवर महत्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.

पक्ष वाढीसाठी प्रयत्न
के. चंद्रशेखर राव यांच्याकडून राज्यात पक्षवाढीसाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी त्यांनी नांदेडला दोन आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक अशा तीन जाहीर सभा देखील घेतल्या आहेत. तर राज्यातील अनेक महत्वाच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. तर अनेक माजी आमदार, खासदार यांच्यासह इतर पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे देखील बीआरएसमध्ये प्रवेश होत आहे. तर आगामी काळात देखील असेच प्रवेश दिले जाणार आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात बीआरएसकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहे.

अधिक वाचा  गोकुळचा पराभव जिव्हारी? महायुतीने पुन्हा एकदा दंड थोपटले? अध्यक्षपद रणनीती विधान परिषद निकालानंतरच ठरणार