कांदा बाजारात तेजीचे वातावरण ४१ रुपये बाजार भाव; उत्साहवर्धक स्थिती आगामी काळातही कांद्याला चांगली अपेक्षा

0

मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात गुरुवारी (ता. १३) कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली. बाजार समितीत कांद्याची एकूण २० हजार ५५० पिशव्यांची आवक झाली. दर्जेदार कांद्याला चांगली मागणी असल्याने अपवादात्मक दर्जाच्या गोळे कांद्याला दहा किलोस तब्बल ४११ रुपये असा उच्चांकी भाव मिळाला.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत बाजार समितीचे सभापती निलेश थोरात म्हणाले, बाजार समितीत दाखल झालेल्या कांद्याच्या गुणवत्तेनुसार दरात चढ-उतार पाहायला मिळाले. चांगल्या प्रतीच्या कांद्याला व्यापाऱ्यांकडून मागणी वाढल्याचे दिसून आले. सुपर गोळे कांद्याला ३३० ते ३५१ रुपये, सुपर मुक्कल कांद्याला ३०० ते ३२० रुपये, अवरेज मीडियम (दोन नंबर) कांद्याला २८५ ते ३०० रुपये, गोल्टी व गोल्टा (चार नंबर) कांद्याला २४० ते २७० रुपये, तर बदला व चिंगळी कांद्याला १०० ते २०० रुपये असा दहा किलोचा दर मिळाला.दरम्यान, कांदा बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले. वाढलेल्या दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

अधिक वाचा  पुणे पदवीधर निवडणूक : हर्षदा देशमुखांनी पाहिल्या फेरीतच विजय आणला दृष्टीक्षेपात; कोटापूर्तीस अवघ्या ७३६ मतांची गरज! लादलेल्या उमेदवारीबाबत कार्यकर्त्यांचा स्पष्ट संदेश?

‘कांद्याला मिळालेला उच्चांकी दर शेतकऱ्यांसाठी उत्साहवर्धक असून, आगामी काळातही कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा आहे,’ असे बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे यांनी सांगितले.