BBPRA टीम तर्फे परिसरातील पाणी साठत असलेल्या ६७ ठिकाणांची यादी सुपूर्द

0

BBPRA टीम तर्फे बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आणि महाळुंगे परिसरातील पावसानंतर पाणी साठत असलेले एकूण ६७ ठिकाणे नीट करण्याबाबत आज प्रभाग ९ चे वॉर्ड ऑफिसर नायकल साहेब यांना पत्र देण्यात आले.  या पत्रात नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणाऱ्या पाणी साठ्याच्या समस्येचे गांभीर्य अधोरेखित करण्यात आले असून, तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याच पत्राची प्रत माननीय नगरसेवकांना येत्या दोन दिवसांत BBPRA टीमकडून देण्यात येणार आहे, जेणेकरून स्थानिक प्रशासन आणि जनप्रतिनिधी यांच्यात समन्वय साधून समस्या सोडवता येईल.

या प्रसंगी BBPRA टीमचे सदस्य सारंग जी रानडे, राघवेंद्रजी देशपांडे, गोपेंद्रजी पाटसकर, सुहासजी कुलकर्णी, जयंतजी कांत आणि प्राजक्ता देवस्थळी उपस्थित होते.

अधिक वाचा  शिक्षक मतदारसंघातील मतदानादरम्यान उमेदवार ढसाढसा रडला, सर्व व्यवस्थेवरचा विश्वास उडालाय, मी इस्लाम स्वीकारणार