जगाची झोप ट्रम्पच्या निर्णयानं उडवली; पुन्हा होर्मुजवर युद्धस्थिती निर्माण मध्यरात्री मोठे हल्ले, अमेरिकेनं इराणच्या युद्धनौकाही उडवल्या

0

इराण विरुद्ध अमेरिका यांच्यातील संघर्ष पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. एकीकडे आम्ही हा संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करत आहोत असं अमेरिकेकडून दाखवलं जात असताना इराण मात्र कोणत्याही सामंजस्य करारासाठी तयार नाही. अमेरिकेच्या जाचक अटी, करार मान्य नाही असं म्हणत आहे. त्यातच आता अमेरिकेनं होर्मुजजवळ इराणच्या समुद्री मॉइन्स बसवणाऱ्या नौकांवर हल्ला केला आहे. पुन्हा एकदा होर्मुजवर युद्धासारखी स्थिती निर्माण होणार का याची जगाला भीती आहे.

होर्मुज हा अत्यंत महत्त्वाचा सागरी रस्ता जगासाठी आहे. भारतासाठी याच मार्गावरून कच्चे तेल येते त्यामुळे आता झालेल्या या संघर्षामुळे गोष्टी आणखी बिघडण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारात आधीच महागाईनं कंबरडं मोडलं आहे. आता ह्यानंतर आणखी महागाईचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक राजकारणातून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. मंगळवारी पहाटे अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमधील इराणी लष्करी तळ आणि लढाऊ नौकांवर भीषण हल्ले केले.

अधिक वाचा  पुणे पदवीधरमध्ये सोलापूर, शिक्षकमध्ये सातारा आघाडीवर शिक्षक मतदारसंघ ८५.८७ तर पदवीधर ६२.७८ टक्के मतदान

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने या कारवाईची अधिकृत माहिती दिली. आपल्या सैनिकांच्या आणि युद्धनौकांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटलं. या हल्ल्यांमुळे आखाती देशांमधील तणाव आणखी वाढला आहे. या हल्ल्यांमध्ये इराणचे Missile Launch Sites आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज या समुद्राच्या अत्यंत महत्त्वाच्या भागात समुद्री सुरुंग लाँच करणाऱ्या इराणी नौकांना यावेळी खास करून टार्गेट करण्यात आलं.

अमेरिकेने का केला हल्ला?

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सच्या दोन संशयास्पद नौका स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये समुद्री मॉइन्स लाँच करणाऱ्या नौकांना टार्गेट केलं. हा मार्ग जागतिक तेल वाहतुकीसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. या नौका आंतरराष्ट्रीय जहाजांना आणि अमेरिकन नौदलाला धोका निर्माण करत असल्याचे पाहताच, अमेरिकन नौसेना आणि हवाई दलाने तात्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये येत दोन्ही इराणी नौका समुद्रातच उद्ध्वस्त केल्या.

अधिक वाचा  मायक्रोसॉफ्टमधून एआयमुळे 60 हजार नोकऱ्यांवर गदा, 1 डिसेंबरचा वेळ दिला एआय टेक्नोलॉजीवर अधिक लक्ष केंद्रीत

“अमेरिकन सैन्याने दक्षिण इराणमध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी हे हल्ले केले आहेत. इराणकडून निर्माण होणारे धोके आम्ही निष्क्रिय केले आहेत. सध्या सुरू असलेल्या युद्धविरामाच्या काळात अमेरिका संयम बाळगत आहे, पण आपल्या सैनिकांच्या सुरक्षेसाठी जे आवश्यक आहे ते आम्ही नक्कीच करू.”

बंदर अब्बास येथील क्षेपणास्त्र तळही उडवला

नौकांवरील कारवाईनंतर अमेरिकेने इराणच्या बंदर अब्बास या लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या भागात असलेल्या जमिनीवरून हवेत मार करणाऱ्या क्षेपणास्त्र (Surface-to-Air Missile – SAM) तळावरही बॉम्बवर्षाव केला. या इराणी क्षेपणास्त्र तळाने अमेरिकेच्या लढाऊ विमानांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने क्षेपणास्त्र लाँचर आणि तिथली संपूर्ण लष्करी पायाभूत रचना उद्ध्वस्त केली.

अधिक वाचा  बाल्कनीतील कपड्यांवर निर्बंध घालण्यापूर्वी पुणे महापालिकेने कचरा व्यवस्थापनातील त्रुटी दूर कराव्यात: पतित पावन संघटनेची मागणी

हल्ल्यांनंतर इराणमध्ये प्रचंड खळबळ

या अमेरिकन कारवाईदरम्यान दक्षिण इराणमधील अनेक भाग भीषण स्फोटांनी हादरले. इराणी माध्यमांनी बंदर अब्बास, सीरिक आणि जास्क या शहरांजवळ लागोपाठ अनेक मोठे धमाके झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. हे सर्व भाग ‘स्ट्रेट ऑफ होर्मुज’च्या जवळ आहेत, जिथून जगातील एकूण तेल निर्यातीचा एक खूप मोठा हिस्सा जातो. त्यामुळे या भागात युद्ध पेटल्यास जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.