कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त संविधान प्रबोधनचे आयोजन!

0

“सामाजिक समता सप्ताह”, “स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण मिशन – २०२६, तसेच स्वच्छतापूर्व पुरस्कार” अन्वये कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्यावतीने प्रभाग क्रमांक १०, ११ व ३१ च्या कार्यक्षेत्रात असणारे डहाणूकर कॉलनी, लक्ष्मीनगर, कोथरूड गावठाण, श्रावणधारा वसाहत, हनुमान नगर, केळेवाडी, श्रमिक वसाहात, सुतारदरा, जयभवानी नगर, श्रमिक वसाहत, म्हातोबा नगर, भिमनगर, शास्त्रीनगर, गाढवे कॉलनी, भुसारी कॉलनी, बावधन (बु.), बावधन (खु.), इत्यादी ठिकाणी तसेच सार्वजनिक स्वच्छता विभागाच्या आरोग्य कोठ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

सामाजिक समता सप्ताहाच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक ३१, डहाणूकर कॉलनी व कोथरूड गावठाण आरोग्य कोठीच्या अंतर्गत लक्ष्मीनगर मध्ये दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल २०२६ दरम्यान “सफाई सेवकांचे आरोग्य तपासणी, कचरा वर्गीकरण, सार्वजनिक शौचालयाची निगा व स्वच्छता, ड्रेनेज स्वच्छता, वस्ती पातळीवरील सार्वजनिक स्वच्छता, पान, तंबाखू, गुटखा, विडी, सिगारेट व दारू इत्यादी व्यसनामुळे होणारी आरोग्याची हानी, नदी नाले स्वच्छता, पाण्याचा अपव्यय, तसेच पर्यावरण रक्षण, प्लॅस्टिकचा भस्मासूर इत्यादी विषयावर प्रबोधन व जनजागृती पर कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त “नाचून मोठे होऊ नका तर, वाचून मोठे व्हा ! माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम प्राणपणाने पूर्ण करा !!

अधिक वाचा  एकनाथ शिंदेंचं 500 कोटींच्या बॉम्बवरुन जरांगेंना प्रतिआव्हान; म्हणाले, पुरावे द्या, दूध का दूध पानी का पानी होईल

तुमच्याकडे दोन नाणी असतील तर, एका नाण्याची भाकर घ्या आणि एका नाण्याचे पुस्तक घ्या! भाकर तुम्हाला जगविल तर पुस्तक जगण्याची कला शिकवेल !!” याशिवाय मुलांनी शिक्षणा पासून वंचित न राहता शिक्षणाची कास धरावी ! संविधानाचा अभ्यास करून सामाजिक समता, स्वातंत्र्य व बंधुता निर्माण करून सर्वधर्म समभाव निधर्मी राष्ट्राची निर्मिती करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून भारत मातेला सुजलाम् सुफलाम् व स्वच्छ, सुंदर करण्यास हातभार लावण्याचे आवाहन महापालिका सहाय्यक आयुक्त सुहास जाधव वरिष्ठ आरोग्य निरिक्षक राम सोनवणे, गणेश खिरिड समाज विकासच्या अनुराधा जगताप कोथरूडचे स्वच्छतेचे ब्रँड अम्बेसिडर वैजीनाथ गायकवाड मोकादम आण्णा ढावरे यांनी केले.

अधिक वाचा  चंद्रकांतदादांच्या रणनीतीमुळे पुणे ‘शिक्षक’ची अशक्य जागा विजयी; पण सर्वत्र धुमधडाका करूनही ‘पदवी’मात्र मिळाली नाही

सदर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रम घनकचरा व्यवस्थापन उपायुक्त अविनाश सकपाळ, परिमंडळ कार्यालय क्रमांक २ चे उपायुक्त संतोष वारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरिक्षक करण कुंभार, प्रमोद चव्हाण, गणेश साठे, लक्षीकांत कुलकर्णी, जया सांगडे निसार शेख, गणेश चोंधे, किरण जाधव, दत्तात्रय दळवी, सचिन सावंत, उमेश शिंदे तसेच मोकादम अशोक कांबळे, साईनाथ तेलंगी, गणेश चव्हाण, राम गायकवाड, लक्ष्मण सोनवणे, संजय कांबळे, सचिन लोंढे इत्यादीनी परिश्रम घेतले.