नितीश कुमारांचा राजीनामा अन् बिहारमध्ये उलथापालथ; भाजपकडून मुख्यमंत्रीपदासाठी नव्या नावाची घोषणा

0

देशात 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू असून पश्चिम बंगाल जिंकण्यासाठी भाजपचे दिग्गज नेते मैदानात उतरले आहेत. त्यातच, दुसरीकडे बिहारच्या राजकारणात बदलाचे वारे वाहत असून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा (CM) राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली होती, जी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील शेवटची बैठक ठरली आहे. कारण, या बैठकीनंतर त्यांनी लोकभवन येथे जाऊन राज्यपाल महोदयांकडे आपला राजीनामा दिला. त्यामुळे, आता बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच भाजपने सम्राट चौधरी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

अधिक वाचा  राज्यात ‘अर्णब’ चक्रीवादळामुळं पाच दिवस पाऊस कोसळणार, या जिल्ह्यांना अलर्ट; गडचिरोली मुसळधारेचा इशारा

नितीश कुमार यांनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून दीर्घकाळ कामकाज पाहिले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांचे समर्थक आणि पार्टीचे कार्यकर्त्यांची काहीशी निराशा झाला आहे. दिल्लीत जाण्यामागे नेमकं काय कारण आहे, हे समोर आले नसले तरी केंद्र सरकारसमवेत ते देशपातळीवर काम करणार आहेत. त्यासाठीच, नितीश कुमार यांनी 10 एप्रिल 2026 रोजी नवी दिल्लीत राज्यसभा सदस्य म्हणून खासदारकीची शपथ देखील घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. नितीश कुमारांच्या या निर्णयामुळे बिहारच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होत आहेत. त्यामुळे, बिहारमध्ये भाजपला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद मिळणार असून बिहारमधील अशा चर्चा सुरु आहेत. बिहारमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेसंदर्भात तयारी जोरदार सुरु आहे. बिहारमधील सत्ताधारी जदयू आणि भाजपनं मंगळवारी त्यांच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतच बिहारच्या पुढील मुख्यमंत्र्‍यांचं नाव निश्चित होणार होते. बिहार भाजपचे अध्यक्ष संजय सरावगी यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावली असून सायंकाळी एनडीएच्या आमदारांची बैठक विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून शिवराज सिंह उपस्थित होते. या बैठकीत सम्राट चौधरी यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाली असून तेच बिहारचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत.

अधिक वाचा  पुणेकरांनो, उन्हाचा चटका आणखी वाढणार! मंगळवारपासून कमाल तापमान ३६ अंशांवर जाण्याचा अंदाज

सम्राट चौधरींना भाजपडकडून संधी

दरम्यान, बिहारचे उपमुख्यमंत्री भाजप नेते सम्राट चौधरी यांच्या नावाची जोरदार चर्चा मुख्यमंत्रीपदासाठी होती. सम्राट चौधरी यांच्या घराची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. ह्याच सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी काही वर्षांपूर्वी डोक्यावर फेटा बांधला होता आणि जोपर्यंत नितीश कुमार यांना हटवणार नाही तोपर्यंत डोक्यावर फेटा काढणार नाही अशी खुनगाठ बांधली होती. आता, भाजपकडून त्यांनाच संधी देण्यात आली असून विधिमंडळ गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे.